banner 728x90

बोईसरमध्ये १७६ जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा उत्साहात…

banner 468x60

Share This:

पालघर-योगेश चांदेकर

जगदीश धोडी यांच्यामुळे साडेचार हजार जोडप्यांच्या जीवनात आनंद, प्रताप सरनाईक यांचे प्रतिपादन

banner 325x300

पालघरः शिवसेना आदिवासी समाज विभाग आणि बोईसर येथील आधार प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सामुदायिक विवाह सोहळ्यात १७६ जोडपी विवाहबद्ध झाली. या सामुदायिक विवाह सोहळ्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी कौतुक करून विवाह सोहळ्याला शुभेच्छा दिल्या. याच समारंभात पालघरच्या जिल्हा निर्मितीच्या वर्धापनदिन एक ऑगस्टला असून त्याच दिवशी पालघर जिल्ह्यासाठी मंजूर झालेल्या स्वतंत्र उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे भूमिपूजन करण्याची घोषणा सरनाईक यांनी केली.

गेल्या सतरा वर्षांपासून आधार प्रतिष्ठानच्या वतीने सामुदायिक विवाह सोहळे आयोजित करण्यात येतात. ग्रामीण भागात विवाह सोहळ्यासाठी खर्च करण्याची अनेकांची ऐपत नसते; परंतु समाजाच्या भितीखातर कर्ज काढून विवाह लावले जातात. त्यातून अनेक लोक कर्जबाजारी झाले आहेत. त्यांचे आयुष्य कर्ज फेडण्यात जाते. हे ओळखून शिवसेना आदिवासी समाज विभाग व आधार प्रतिष्ठानच्या वतीने ग्रामीण भागातील आदिवासी दुर्बल घटकांना एकत्रित करून त्यांच्या मुला-मुलींचे सामुदायिक विवाह सोहळे आयोजित करण्यास जगदीश धोडी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सुरुवात केली.

धोडी यांच्यामुळे कन्यादान अनुदानात वाढ
कोरोनाचा काळ वगळता या उपक्रमात कधीही खंड पडला नाही. आत्तापर्यंत या विवाह सोहळ्यात सुमारे साडेचार हजारांहून अधिक जोडपी विवाहबद्ध झाली आहेत. सामुदायिक विवाह सोहळ्यात लग्न करणाऱ्या आदिवासी जोडप्यांना कन्यादान म्हणून राज्य सरकार दहा हजार रुपयांची मदत करत होते; परंतु ही मदत अतिशय तुटपुंजी असल्याचे धोडी यांनी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निदर्शनास आणले. मागच्या सामुदायिक विवाह सोहळ्याला स्वतः शिंदे हजर होते. त्यांनी धोडी यांची भावना लक्षात घेऊन त्याचवेळी कन्यादान योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या मदतीत दुपटीहून अधिक वाढ करून ती २५ हजार रुपये केली. आज परिवहनमंत्री सरनाईक यांनी या मदतीत राज्य सरकार आणखी वाढ करणार असल्याचे सूतोवाच केले.

आचारसंहितेच्या आधीच भूमिपूजन
सरनाईक यांनी पालघर जिल्ह्यात मागच्या वेळी उप प्रादेशिक परिवहन कार्यालय सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. या आश्वासनाची पूर्ती म्हणून त्यांनी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय मंजूर केल्याचा शासनाचा आदेश या विवाह सोहळ्यात वाचून दाखवला आणि उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या आचारसंहितेत काम रखडू नये, म्हणून अवघ्या ७० दिवसांनी म्हणजे एक ऑगस्टला या कार्यालयाचे भूमिपूजन करण्याचा निर्णय घोषित केला. याशिवाय रिक्षा चालक संघटनेचे प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन त्यांनी दिले. उप प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी रिक्षा चालकांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशा सूचनाही त्यांनी या वेळी केल्या.

नवदांपत्याचे कन्यादान आणि संसरोपयोगी साहित्य
धोडी आणि त्यांचे सहकारी राबवत असलेले उपक्रम अतिशय स्तुत्य असून हा सामुदायिक विवाह सोहळ्याचा उपक्रमाचा आदर्श राज्यभर जावा असा आशीर्वाद सरनाईक यांनी या वेळी दिला त्याचबरोबर त्यांच्या हस्ते नवदांपत्यांना आवश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले तसेच कन्यादान करण्यात आले.

उपमुख्यमंत्र्यानीही दिल्या शुभेच्छा
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्टार्टअपच्या बैठकीत व्यस्त असल्यामुळे पालघर जिल्ह्यातील कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत; परंतु त्यांनी मोबाईलवरून या सामुदायिक विवाह सोहळ्यातील नवदांपत्यांना शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर जगदीश धोडी गेल्या सतरा वर्षांपासून राबवत असलेला हा उपक्रम अतिशय स्तुत्य असून आदिवासी समाजाचा आशीर्वाद घेण्याचे काम ते करत आहेत. स्वतःसाठी काहीही न मागता समाजासाठी झटणाऱ्या धोडी यांचे काम हे इतरांसाठी प्रेरणादायी आहे असे कौतुक शिंदे यांनी केले. आमदार राजेंद्र गावित यांनीही या उपक्रमाचे कौतुक करताना धोडी आणि त्यांचे सहकारी समाजातील दीनदुबळ्यांसाठी एक आदर्श असून गोरगरिबांच्या विवाहाचा खर्च पेलवत नसताना स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून लोकांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचे काम करत असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले.

शिंदेच्या मदत वाढवण्याच्या निर्णयाचा उल्लेख
धोडी यांनी प्रास्ताविकात गोरगरीब विवाह करण्यासाठी कर्ज काढतात, अशा सोहळ्यामुळे त्यांना कर्ज न घेता विवाह करता येत असल्याचे सांगून उपमुख्यमंत्री शिंदे यांनी कन्यादान योजनेत मदत कशी वाढवली याचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला. या सोहळ्यास शिवसेनेचे संपर्क नेते रवींद्र फाटक, आमदार राजेंद्र गावीत, पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील आधार प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेंद्र सिंग, भाजपचे नेते संजय पाटील, जिल्हा प्रमुख कुंदन संखे, वैभव संखे, उपनेत्या ज्योती मेहेर, आनंद धोडी, भारती कामडी, महेंद्र सिंग, रणवीर शर्मा, आदी उपस्थित होते. हा सामुदायिक विवाह सोहळा पार पाडण्यासाठी आधार प्रतिष्ठानचे आनंद धोडी, पौर्णिमा धोडी, सागर धोडी, आणि कल्पेश धोडी, धीरज सिंग, संकेत सिंग, कलापती पाटील, अमित पाठक आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

कोट
‘पालघर जिल्ह्यात आदिवासी दुर्बल आणि गरीब लोकांच्या जीवनात आनंद निर्माण करता यावा आणि विवाहासाठी या समाज घटकांनी कर्जबाजारी होऊ नये, म्हणून आपण हा उपक्रम सुरू केला. या उपक्रमासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोलाची मदत केली. हा उपक्रम अशाच प्रकारे यापुढेही सुरू राहील.
जगदीश धोडी, शिवसेना उपनेते व सचिव, आधार प्रतिष्ठान, बोईसर

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!