banner 728x90

“विविध प्रकल्पांच्या स्थळ पाहणीचा अहवाल सादर करा” आमदार राजेंद्र गावित यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

banner 468x60

Share This:

पालघर-योगेश चांदेकर

भूसंपादनासंदर्भात रेल्वे अधिकाऱ्यांना निर्देश

banner 325x300

पालघरः पालघर जिल्ह्यातील विविध प्रकल्पांबाबत सविस्तर माहिती घेऊन लोकांच्या समस्यांचे निरसन करा तसेच तात्काळ स्थळ पाहणी अहवाल सादर करा, अशा सूचना पालघर विधानसभेचे आमदार राजेंद्र गावित यांनी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

आमदार गावित, जिल्हाधिकारी इंदूराणी जाखड, सहायक जिल्हाधिकारी विशाल खत्री, उपजिल्हाधिकारी महेश सागर, तेजस चव्हाण, रवींद्र राजपूत, नरेंद्र पाटील, सहायक नगर रचनाकार भाग्यश्री, मुंबई बडोदा महामार्गाचे प्रकल्प संचालक बोईसरचे सरपंच दिलीप धोडी, उपसरपंच नीलम संखे आदींच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. या वेळी आमदार गावित यांनी विविध प्रकल्पासंदर्भात चर्चा केली.

रेल्वेच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर चर्चा
विरार-डहाणू रेल्वे चौपदरीकरण, दिल्ली फ्रंट कॉरिडॉर, बुलेट ट्रेन इत्यादी रेल्वे प्रकल्पाशी संबंधित ओम साई सोसायटी खोजा चाल कपाशी ते नवली ब्रीजदरम्यान गेट नंबर 44 45 येथे ओव्हर ब्रीज, बोईसर काटकर पाडा गेट नंबर 52 येथे आरओबी, आरयूबी, व अंडर बायपासमधील पावसात भरणारे पाणी तसेच भूसंपादनासंदर्भात आ. गावित यांनी सूचना दिल्या. अधिकाऱ्यांशी त्यांनी चर्चा करून स्थळ पाहणी करण्याचे निर्देश दिले.

भूसंपादन निवाड्यातील अनियमितता दूर करा
मुंबई अहमदाबाद महामार्ग व मुंबई-बडोदा द्रुतगती महामार्गावरील भूसंपादन निवाडा प्रक्रियेतील अनियमिततेसंदर्भात त्यांनी चर्चा केली. दुर्वेश दापचरी, कुडे बेलदार येथील नवीन ब्लॅक स्पॉट, टॅपिंगचे निकृष्ट काम यासंदर्भात आलेल्या तक्रारीचा निवाडा करण्याचे आदेश आमदार गावित यांनी दिले. कामाच्या संदर्भात स्थळ पाहणी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना त्यांनी राष्ट्रीय महामार्गाच्या प्रकल्प संचालकांना दिल्या. पालघर जिल्ह्यातील खडखळ, देहरजे, लेंडी धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या पुनर्वसनाशी व नागरी सुविधा प्रकल्पांच्या बाधितांचे हक्क व मोबदल्यासंदर्भात अधिकाऱ्यांना सूचना देऊन सामान्य माणूस केंद्र बिंदू म्हणून काम करावे, असे त्यांनी सांगितले.

कोट
‘पालघर जिल्ह्यातील विविध विकास कामासंदर्भात व भूसंपादनाबाबत नागरिकांच्या काही तक्रारी आहेत. त्या समजावून घेऊन त्याबाबत स्थळ पाहणी करण्याचे निर्देश दिले असून अहवाल आल्यानंतर त्यावर योग्य ती कार्यवाही करण्यास प्रशासनास सांगण्यात येईल.
राजेंद्र गावित, आमदार, पालघर

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!