हवामान विभागाने राज्यातील पावसाचा अंदाज वर्तवला आहे. हवामान खात्याच्या (IMD) विभागाने प्रादेशिक भागांनुसार पावसाचा अंदाज जारी केला आहे. यामध्ये कोकण, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील पावसाचा अंदाज जारी केला आहे.
25 जून रोजी पावसाचा अंदाज कसा असेल याबाबतची माहिती जाणून घेऊयात.
कोकण
कोकणात 25 जून रोजी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाच्या सरींची शक्यता आहे. काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. विशेष करून रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये मुसलधार पाऊस असेल. तर मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये रिमझिम पाऊस किंवा तुरळक ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी कोसळतील. तर मुंबईत सकाळी 5 – 6 वाजता भरती येण्याची शक्यता आहे. त्यामुळे समुद्रकिनारी पाणी साचण्याचा धोका निर्माण होऊ शकतो.
पश्चिम महाराष्ट्र
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुणे आणि कोल्हापूरात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी पेरणीपूर्वी पावसाच्या अंदाजानुसार नियोजन करावे, तसेच पावसाची अनियमितता असू शकते.
मराठवाडा
मराठवाडा विभागात हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहील. उष्णतेच्या लाटेमुळे पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे दुपारच्या वेळी बाहेर पडताना सावधानता बाळगण्याचं हवामान विभागाने आवाहन केलं आहे.
विदर्भ
विदर्भात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल. विशेष म्हणजे चंद्रपूर, आणि वर्धा येथील काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. या पावासाचा शेतीसाठी चांगला फायदा होईल.
उत्तर महाराष्ट्रातील नाशिक आणि अहमदनगरमध्ये हलका किंवा ढगाळ पावसाचे वातावरण राहील. धुळे आणि जळगावात पावसाची शक्यता आहे, परंतु तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे.