banner 728x90

जायकवाडी, गंगापूर, उजनी, कोयना ‘ही’ धरणे किती टक्क्यांवर आली, वाचा राज्याचा पाणीसाठा

banner 468x60

Share This:

छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर विभाग वगळता राज्यातील सर्व विभागांमध्ये पाऊस सुरू आहे. यामुळे धरणातील जलसाठा चांगला झाला आहे. आठ जुलै पर्यंत राज्यातील प्रमुख धरणांपैकी चार धरणे शंभर टक्के भरली आहेत.

इतर धरणांमध्ये किती पाणीसाठा आहे हे सविस्तर पाहूयात

प्रमुख धरणांमध्ये अहिल्या नगर जिल्ह्यातील भंडारदरा धरण ७०.९९ टक्के, निळवंडे धरण ८४.६४ टक्के, आढळा धरण १०० टक्के, भोजापुर धरण १०० टक्के, सीना धरण १०० टक्के, येडगाव धरण ८९ टक्के भरले आहे.

तसेच नाशिक विभागातील गंगापूर धरण ५७.५८ टक्के, दारणा धरण ६७.३० टक्के, गिरणा धरण ४४.२७ टक्के, हातनुर धरण २९.८८ टक्के, अनेर धरण ३०.९३ टक्के, पांझरा धरण १०० टक्के भरले आहे.

तसेच राज्यातील महत्त्वाच्या धरणांपैकी एक असलेल्या उजनी धरणात ९४.३६ टक्के असा एकूण जलसाठा असून उपयुक्त जलसाठा हा ८७.६८ टक्के आहे. त्याचबरोबर कोयना धरणात ६४.७८ टक्के, उपयुक्त जलसाठा राधानगरी धरणात ७८.८८ टक्के, अलमपट्टी धरणात ६६.४९ टक्के, जायकवाडी धरणात ५७.२९ टक्के पाणीसाठा आहे. त्याचबरोबर मराठवाड्यातील काही धरणांचा विचार केला तर केवळ तेरणा धरण ७० टक्क्यांवर असून इतर धरण ५० टक्क्यांच्या आत असल्याचा चित्र आहे.

मुंबई सह कोकण विभागातील धरणांची स्थिती पाहिली असता मोडक सागर धरण ९४.८२ टक्के, तानसा धरण ७६.४० टक्के, मध्यम वैतरणा धरण ९३.४७ टक्के, भातसा धरण ७०.२६ टक्के, अप्पर वैतरणा धरण ५१ टक्के तर तिलारी धरण ८४.१० टक्के भरले आहे.

पुणे विभागातील धरणांची पाणी पातळी पाहिली असता चासकमान धरण ८१.२७ टक्के, पानशेत धरण ६५.८९ टक्के, खडकवासला धरण ६२.१७ टक्के, वीर धरण ८४.८९ टक्के, मुळशी धरण ७६.६७ टक्क्यांवर आहे.

नागपूर विभागातील गोसीखुर्द या धरणात २५.१५ टक्के, तोतया डोह या धरणात ५४.५१ टक्के, खडकपूर्णा धरणात केवळ ०४.५० टक्के, काटेपूर्णा धरणात २२.८० टक्के, उर्ध्व वर्धा धरणात ४२.५७ टक्के जलसाठा आहे.

राज्यातील धरणांतून सुरू असलेला विसर्ग
भंडारदरा धरण ६ हजार ३० क्युसेक, निळवंडे धरण १३ हजार ६५० क्युसेक, ओझर प्रवरा नदी धरण १४ हजार ६७५, गंगापूर धरण ०६ हजार ३३६ क्युसेक, दारणा धरण १३ हजार ६० क्युसेक, नांदूर मध्यमेश्वर बंधारा ४३ हजार ८८२ क्युसेक, राजापूर बंधारा ८४ हजार ५०० क्युसेक, गोसेखुर्द धरण तीन लाख १७ हजार ७६७ क्युसेक असा विसर्ग सुरू आहे.

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!