ठाणे गुन्हे शाखा आणि अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या विशेष मोहिमेत केलेल्या दोन वेगवेगळ्या कारवाईत दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून २ किलो १८४ ग्रॅम वजनाचा एमडी पावडर जप्त केला आहे.
पकडलेल्या एमडी पावडरची किंमत सुमारे चार कोटी इतकी असून, पकडलेल्या दोघांमध्ये एका झोमॅटो फुड डिलेव्हरी बॉयचा समावेश आहे.
ठाणे गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक आणि युनिट एक पथकाने केलेल्या कारवाईत ३ कोटी ९७ लाख रुपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहेत. ड्रग्जची तस्करी करण्यासाठी आलेल्या इरफान अमानुल्ला शेख (३६, उलवे, तालुका पनवेल) आणि शाहरुख सत्तार मेवासी उर्फ रिजवान (२८, मंदसौर, मध्य प्रदेश) या दोघांना अटक करण्यात आली आहे.
ठाणे अंमली पदार्थ विरोधी पथकाला गुप्त माहिती मिळाली होती की एक व्यक्ती डायघर परिसरात एमडी ड्रग्ज विकण्यासाठी येणार आहे. त्यानंतर २७ जुलै रोजी संध्याकाळी पोलिस पथकाने शिलफत्या ते दिवागाव या रस्त्यावर पाळत वाढवली. यावेळी पोलिसांना एका अन्न वितरण करणाऱ्या व्यक्तीवर संशय आला आणि त्याला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून १ किलो ५२२ ग्रॅम एमडी म्हणजेच मेफेड्रोन जप्त करण्यात आले. यानंतर पोलिसांनी ३ कोटी ४ लाख ७१ हजार रुपयांचे हे ड्रग्ज जप्त केले आणि डिलिव्हरी बॉय इरफान अमानुल्ला शेख (३६, उलवे, तालुका पनवेल) याला अटक केली. त्याच्याविरुद्ध डायघर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून न्यायालयाने त्याला ३१ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
दुसरी कारवाई ठाणे गुन्हे शाखा युनिट वनच्या पथकाने २४ जुलै रोजी कळवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत केली. युनिट वनच्या पथकाला भिवंडी-मुंब्रा रोडवर एमडी ड्रग्ज विकण्यासाठी एक तस्कर येत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी भिवंडी-मुंब्रा रोडवरील खारेगाव टोल प्लाझाजवळ सापळा रचला आणि कार चालक, संशयित इस्मासला अटक केली.
येत्या ३१ जुलैपर्यंत त्या दोघांना पोलीस कोठडी मिळाली असल्याची माहिती ठाणे गुन्हे शाखेचे उपायुक्त अमरसिंह जाधव यांनी दिली. शिळ फाटयाकडून दिवा गांवाकडे जाणाऱ्या रोडवर एक जण एमडी पावडर विक्रीसाठी येणार असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलिस हवालदार हरिश तावडे यांना मिळाली होती. त्यानुसार २७ जुलै २०२५ रोजी सापळा रचून केलेल्या कारवाईत पनवेल येथील इरफान अमानुल्लाह शेख (३६) याला ताब्यात घेत, त्याच्याकडून १ किलो ५२२ ग्रॅम वजनाचा ‘एमडी’ जप्त केला. तसेच पकडलेला इरफान हा झोमॅटो फुड डिलेव्हरी बॉय असून, त्याच्याकडून जप्त केलेल्या एमडी पावडरची किंमत ३ कोटी ०४ लाख ७१ हजार ७०० रुपये इतकी आहे. याप्रकरणी शीळ डायघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. तसेच त्याला येत्या ३१ जुलैपर्यंत पोलिस कोठडी मिळाली आहे.
भिवंडीकडुन मुंब्याकडे जाणाऱ्या वाहिनीवर, बंद असलेल्या खारीगांव टोलनाक्याजवळ मध्यप्रदेशमधील शाहरूख सत्तार मेवासी याला ताब्यात घेतले. त्याच्या कार ६६२ ग्रॅम वजनाचा एमडी पकडला असून, त्याची किंमत ९२ लाख ६८ हजार रूपये इतकी आहे. याप्रकरणी कळवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. त्याला ३० जुलै पर्यंत पोलिस कोठडी मिळाली आहे. या दोन्ही कारवाईमध्ये जप्त केलेला अंमली पदार्थाचे उत्पादन, विक्री, वाहतुक, साठवणुक यामध्ये कोण कोण सहभागी आहे.