महाराष्ट्रातून देशांतर्गत विमान प्रवाशांची संख्या गेल्या चार वर्षांत विक्रमी वाढली आहे. 2021 मध्ये 1 कोटी 33 लाख 96 हजार प्रवाशांनी विमान प्रवास केला होता. तर 2024 मध्ये ही संख्या तब्बल चौपटीने वाढून 5 कोटी 24 लाख 70 हजार इतकी झाली आहे.
याच कालावधीत मालवाहतुकीतही वाढ झाली असून, 2024 मध्ये 2 लाख 78 हजार टनांवर गेली आहे. यामुळे साहजिकच विमान उड्डाणांची संख्या वाढून ती 3 लाख 68 हजार 815 वर पोहोचली आहे. कोरोनानंतर विमान प्रवासाच्या मागणीत झालेल्या सुधारण्याचे हे प्रतीक मानली जात आहे.
तज्ज्ञांच्या मते, पर्यटन क्षेत्रातील वाढ, व्यावसायिक प्रवास तसेच नोकरीसाठी होणारी स्थलांतरित हालचाल यामुळे प्रवासाची मागणी झपाट्याने वाढली आहे. 2022 मध्ये प्रवाशांची संख्या 2 कोटी 45 लाख 65 हजारांवर गेली, तर 2024 मध्ये 5 कोटी 24 लाख 70 हजार इतकी झाली. महाराष्ट्रातील विमानतळांची क्षमता आणि नव्या सुविधां निर्माण झाल्याने प्रवाशांच्या प्रवाहात वाढ झाली आहे. दरम्यान, विमान उड्डाणांची संख्यादेखील वाढती दिसून येते. 2023 मध्ये विमान उड्डाणे 3,35,651 होती, जी 2024 मध्ये वाढून 3,68,815 वर पोहोचली. या आकडेवारीवरून स्पष्ट होते की, देशांतर्गत प्रवाशांची झपाट्याने वाढत आहेत.