तीन दिवसांपूर्वी (24 ऑगस्ट) मनसेचे प्रमुख राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे यांनी मंत्री आशिष शेलार यांची भेट घेतली होती. अचानक झालेल्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात होते.
मात्र, गणेशोत्सवात काळात विद्यार्थ्यांच्या परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी शेलार यांच्याकडे केल्याचे अमित ठाकरे यांनी सांगितले होते.
या मागणीला प्रतिसाद देत आशिष शेलार यांच्या उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालयाकडून आदेश देत गणेशोत्सवा काळात होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्याचे आदेश दिले आहे. त्यानंतर अमित ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत आशिष शेलार यांचे आभार मानले.
ते म्हणाले, ‘हा राज्य महोत्सव म्हणून घोषित असूनही अनेक शाळा व महाविद्यालयांनी त्याच काळात परीक्षा ठेवून विद्यार्थ्यांचा आनंद हिरावून घेतला होता. या परीक्षा पुढे ढकलण्याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने केलेल्या ठाम मागणीला प्रतिसाद देत सरकार तर्फे शासन निर्णय जारी करण्यात आला असून गणेशोत्सव काळातील परीक्षा पुढे ढकलण्यात येणार आहेत.’
विद्यार्थ्यांना निर्धास्तपणे, ताणमुक्त होऊन, आपल्या कुटुंबासह गणेशोत्सवाचा आनंद लुटता यावा हीच आमची इच्छा होती. हा निर्णय म्हणजे आपल्या संस्कृतीचा विजय आहे, असे म्हणत या निर्णयासाठी आशिष शेलार यांचे अमित ठाकरेंनी आभार मानले आहेत.
उद्धव ठाकरे शिवतीर्थावर येणार
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी घरच्या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी उद्धव ठाकरेंना फोन करून निमंत्रण दिले होते. त्यानुसार उद्धव ठाकरे सहपरिवार राज ठाकरेंचे निवासस्थान शीवतीर्थ येथे उपस्थित राहून गणरायाचे दर्शन घेणार आहेत.
















