मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत मोठी बातमी समोर आली आहे. लाडक्या बहिणींना अपेक्षित असलेल्या ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा अखेर संपली असून सरकारकडून थेट त्यांच्या खात्यात पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
आतापर्यंत १३ हप्त्यांचे पैसे लाभार्थींना मिळाले आहेत आणि आता १४व्या हप्त्याचं वितरण सुरु झाल्याने राज्यातील लाखो महिलांना दिलासा मिळाला आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत मोठी बातमी समोर आली आहे. लाडक्या बहिणींना अपेक्षित असलेल्या ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा अखेर संपली असून सरकारकडून थेट त्यांच्या खात्यात पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. आतापर्यंत १३ हप्त्यांचे पैसे लाभार्थींना मिळाले आहेत आणि आता १४व्या हप्त्याचं वितरण सुरु झाल्याने राज्यातील लाखो महिलांना दिलासा मिळाला आहे.
महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनीही X या सोशल मीडियावर यासंदर्भात माहिती दिली आहे. त्यांनी सांगितलं की, “महाराष्ट्रातील सर्व पात्र लाभार्थी महिलांच्या आधार संलग्नित बँक खात्यांमध्ये थेट सन्मान निधी जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. महिलांच्या सक्षमीकरणासाठी ही योजना मोठा टप्पा ठरत आहे.” महायुती सरकारने जुलै २०२४ मध्ये ही योजना सुरू केली होती आणि त्यानंतर सातत्याने पात्र लाभार्थींना हप्ता मिळत आहे.
योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये दिले जातात. तर, पीएम किसान सन्मान निधी व नमो शेतकरी महासन्मान निधीचा लाभ घेणाऱ्या शेतकरी महिलांना दरमहा ५०० रुपये दिले जातात. ही योजना जाहीर झाल्यापासून आतापर्यंत १३ हप्ते थेट महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. दरम्यान, ऑगस्ट महिन्याच्या हप्त्यासाठी आर्थिक तरतूदही करण्यात आली आहे. सामाजिक न्याय विभागाने ९ सप्टेंबर रोजी ३४४.३० कोटी रुपये महिला व बालविकास विभागाला वर्ग केले असून यामुळे ऑगस्ट महिन्याच्या लाभाच्या वितरणाची प्रक्रिया अधिकृतपणे सुरू झाली आहे.
महायुती सरकारसाठी ही योजना एक प्रकारचा गेमचेंजर ठरली आहे. मागील निवडणुकीत महिलांनी मोठ्या प्रमाणावर या योजनेवर विश्वास दाखवला आणि आता नियमित हप्त्यांच्या स्वरूपात त्या महिलांना थेट बँक खात्यातून आर्थिक मदत मिळत आहे. त्यामुळे महिलांच्या आर्थिक स्वावलंबनाला हातभार लागला असून समाजातील सर्वसामान्य माता-भगिनींमध्ये समाधानाचं वातावरण आहे.

















