महाराष्ट्रात कमी दाबाच्या पट्ट्यांमुळे मान्सून पुन्हा सक्रीय झाला आहे. ५ ऑक्टोबरपर्यंत कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
महाराष्ट्र आणि गुजरातच्या समुद्रकिनाऱ्यालगत तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात पुन्हा मान्सून सक्रीय झाला आहे. हवामान विभागाने पुढील पाच दिवस कमी-अधिक प्रमाणात पावसाचा अंदाज वर्तवला असून कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागांना पावसाचा सर्वाधिक फटका बसू शकतो.
सध्या अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात दोन हवामान प्रणाली सक्रिय आहेत. गुजरात-महाराष्ट्र किनाऱ्यालगत कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून तो महाराष्ट्राच्या दिशेने सरकत आहे. या प्रक्रियेत टर्फ लाईनची महत्त्वाची भूमिका असून ती महाराष्ट्रातील जिल्ह्यांतून सरकत बंगालच्या उपसागरापर्यंत पोहोचत आहे. तसेच आंध्र प्रदेशच्या आसपास नवीन कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने हवामान अस्थिर झाले आहे.
हवामान विभागानुसार, कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात ५ ऑक्टोबरपर्यंत अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस अपेक्षित आहे.
कोकण किनारपट्टी : सर्वाधिक पावसाचा जोर राहणार.
मध्य महाराष्ट्र : पुणे, सातारा, नाशिकसह घाटमाथा भागांत पावसाची तीव्रता वाढणार.
विदर्भ व मराठवाडा : निवडक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचे संकेत.
सध्याच्या प्रणाली पुढील ४८ तासांत किती तीव्र होतात हे निर्णायक ठरणार आहे. जर त्यांची तीव्रता वाढली तर त्यांचे वादळात रूपांतर होऊ शकते. अशा परिस्थितीत अतिवृष्टीचा धोका निर्माण होऊ शकतो, असे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.
सध्या कोणत्याही जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी केलेला नाही. तरी हवामान विभागाने स्पष्ट केले आहे की परिस्थिती गंभीर झाली तर पुढील ४८ तासांत रेड अलर्ट दिला जाऊ शकतो. नागरिक व शेतकऱ्यांनी हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करून आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
Home
Whether News
Maharashtra Rain Alert : महाराष्ट्रात पुन्हा मान्सून सक्रीय; 5 ऑक्टोबरपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज
Maharashtra Rain Alert : महाराष्ट्रात पुन्हा मान्सून सक्रीय; 5 ऑक्टोबरपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज
Recommendation for You

Post Views : 295 राज्यात उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे सकाळी आणि संध्याकाळी वातावरण थंड राहिल,…

Post Views : 295 पालघर-योगेश चांदेकर पालघरः पालघर जिल्ह्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीत भाजपचे जिल्हाध्यक्ष…

राज -उद्धव ठाकरे एकत्र, आज दुपारी ऐतिहासिक युतीची घोषणा, जागावाटप ठरलं, कोण किती जागांवर लढणार? वाचा
Post Views : 295 मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी…

Post Views : 295 इयत्ता दहावी- बारावीच्या परीक्षा पूर्णत: कॉपीमुक्त होण्यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व…












