banner 728x90

अयोध्येत २९ लाख दिव्यांची विक्रमी आरास! ‘गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद

banner 468x60

Share This:

दिवाळीनिमित्त प्रभू रामचंद्र यांचे जन्मस्थान असलेली अयोध्या नगरी २९ लाख दिव्यांनी झळाळून निघाली. ही विक्रमी आरास तसेच अन्य एक विक्रम ‘गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंदला गेला आहे.

प्रारंभी ‘राम की पैडी’ येथील ५६ घाटांवर २६.११ लाख दिवे प्रज्वलित करण्यात आले. तसेच शरयू तीरावर अन्यत्रही दिव्यांची आरास करण्यात आली होती. अयोध्या नगरी एकूण २९ लाख दिव्यांनी झळाळून गेली होती. हा ‘दीपोत्सव’ पाहण्यासाठी जगभरातून लोक अयोध्येत दाखल झाले आहेत. ड्रोनच्या सहाय्याने या दिव्यांची गणना केल्यानंतर ‘गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’चे स्वप्निल दंगारीकर व सल्लागार निश्चल बारोट यांनी विश्वविक्रमाची घोषणा केली.

सलग नवव्यांदा हा जागतिक विक्रम बनला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, प्रभारी मंत्री सूर्य प्रताप शाही व अन्य या अविस्मरणीय क्षणाचे साक्षीदार बनले. तसेच शरयू नदीवर झालेल्या आरतीत २,१०० वेदाचार्य सहभागी झाले होते. या विक्रमाचीही नोंद ‘गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये झाली.

अयोध्येतील अद्भुत दीपोत्सव पाहायला देशाच्या विविध भागातून लाखो भाविक शहरात आले आहेत. दीपोत्सवानंतर भव्य आतषबाजी व ड्रोन शो पार पडला.

banner 325x300

‘गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’च्या ७५ जणांच्या पथकाने शरयू नदी तीरावरील ५६ घाटांवरील दिव्यांची मोजणी केली. यासाठी विद्यापीठाचे पर्यवेक्षक, घाट प्रभारी, समन्वयक व स्वयंसेवक उपस्थित होते. दिवे लावण्यापूर्वी घाटावर तेल पडू नये याकडे बारकाईने लक्ष दिले गेले.

दीपोत्सवापूर्वी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ‘रामकथा पार्क’च्या मंचावर श्रीराम यांची सांग्रसंगीत पूजा केली. मुख्यमंत्री योगी यांनी लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न आणि गुरु वशिष्ठ यांचीही पूजा केली. यावेळी ‘जय श्रीरामा’च्या जयघोषाने शरयू तीर दुमदुमून गेले.

कडक सुरक्षा व्यवस्था

अयोध्येतील दीपोत्सवासाठी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. १० हजार जवानांकडे सुरक्षेचा भार आहे. गुप्तचर यंत्रणा विविध स्वरुपात कार्यरत आहेत. जागोजागी पोलीस, आरएएफचे जवान आहेत. अयोध्येत यापूर्वी काम केलेल्या अनुभवी पोलीस अधिकारी व प्रशासकीय अधिकाऱ्यांना विशेष जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत.

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!