banner 728x90

यात्रीगण कृपया ध्यान दे.! महाराष्ट्रातील ‘या’ शहरात तयार होणार नवीन रेल्वे स्टेशन, कस राहणार नवं स्थानक?

banner 468x60

Share This:

मुंबई आणि मुंबई उपनगरातील रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्त्वपूर्ण अपडेट समोर येत आहे. खरंतर लोकल ही मुंबईची लाईफ लाईन म्हणूनच ओळखली जाते. मात्र लोकलमध्ये होणारी गर्दी हा एक चिंतेचा विषय आहे.

दरम्यान लोकलमध्ये गर्दी कमी व्हावी या अनुषंगाने रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून तसेच राज्य शासनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात आहेत, वेगवेगळे रेल्वेचे प्रकल्प राबवले जात आहेत.

यातीलच एक महत्त्वाचा प्रकल्प आहे कल्याण ते बदलापूर दरम्यान विकसित केली जाणारी तिसरी आणि चौथी मार्गिका. हा प्रकल्प लोकल मधील गर्दी कमी करण्यासाठी गेम चेंजर ठरणार आहे.

या प्रकल्पामुळे कल्याण ते बदलापूर हा प्रवास वेगवान होणार असून याच प्रकल्पाच्या बाबत आता एक महत्त्वाचे अपडेट हाती आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार या प्रकल्पाचे 30 टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित काम देखील युद्ध पातळीवर सुरू आहे.

त्यामुळे हा प्रकल्प नियोजित वेळेत पूर्ण होईल म्हणजेच 2026 पर्यंत या प्रकल्पाचे काम पूर्ण होणार आहे आणि या मार्गावर प्रवास करणाऱ्या लोकलच्या प्रवाशांना दिलासा मिळणार असा आशावाद व्यक्त होतोय.

या प्रकल्पाचे काम मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनच्या (एमआरव्हीसी) माध्यमातून एमयूटीपी 3 ए अंतर्गत पूर्ण केले जात आहे. यामुळे या मार्गावरील वाहतूक क्षमता वाढणार आहे.

लोकलमधील गर्दी कमी होण्यासोबतच या नव्या मार्गामुळे अतिरिक्त लोकल सेवा सुद्धा उपलब्ध होणार आहेत. या प्रकल्पासाठी 1,510 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

या प्रकल्पाच्या माध्यमातून विठ्ठलवाडी, उल्हासनगर आणि अंबरनाथ येथे प्लॅटफॉर्म विस्तारीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले आहे. तसंच, या प्रकल्प अंतर्गत एक नवीन रेल्वे स्थानक सुद्धा विकसित केले जाणार आहे.

इथं विकसित होणार नवीन रेल्वे स्थानक

मिळालेल्या माहितीनुसार रेल्वे प्रशासनाच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्प अंतर्गत अंबरनाथ आणि बदलापूर रेल्वे स्थानकादरम्यान नवीन रेल्वे स्थानकाची उभारणी करण्यात येणार आहे. या दोन महत्त्वाच्या स्थानकादरम्यान चिखलोली हे नवे स्थानक उभे राहत आहे.

महत्वाची बाब म्हणजे आतापर्यंत चिकलोली स्टेशन इमारतीचा पहिल्या मजल्याचा स्लॅब पूर्ण झाला आहे. म्हणजेच लवकरच हे स्थानक पूर्ण होईल आणि त्यानंतर सर्वसामान्यांसाठी खुले होणार आहे. या नव्या स्थानकामुळे अंबरनाथ आणि बदलापूर रेल्वे स्थानकाचा भार सुद्धा कमी होणार आहे.

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!