banner 728x90

नगर परिषद, नगर पंचायत निवडणूकांच्या आज प्रचाराच्या तोफा थंडावणार; वेळेत बदल.

banner 468x60

Share This:

राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीचा प्रचार आज सोमवारी थांबणार आहे. राज्यात भाजप विरुद्ध अजित पवार गट आणि शिंदेसेना असा सामना पहायला मिळत आहे.यासाठी फडणवीसांसह अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी देखील ठिकठिकाणी जोरदार प्रचार केला.

दुसरीकडे काँग्रेस, शरद पवार गट, उद्धव सेना या विरोधी पक्षांचा प्रचार सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांच्या प्रचारासमोर फिका पडल्याचे दिसले. रविवारी सर्वच पक्षातील प्रमुख नेते राज्यभर प्रचाराच्या दौऱ्यावर होते, तर सोमवारी प्रचाराचा शेवटचा दिवस असल्यामुळे अनेक पक्षांनी अंतिम शक्तिप्रदर्शनासाठी सभा, जनसंपर्क आणि रोड शो आयोजित केले आहेत.

मतदानाची वेळ

मंगळवारी २ डिसेंबर रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० पर्यंत मतदानाची वेळ असेल. मतमोजणी सर्व संबंधित ठिकाणी ३ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजल्यापासून सुरु होईल आणि मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर निकाल जाहीर केला जाईल. निकाल जाहीर झाल्यानंतर नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या क्षेत्रापुरती असलेली आचारसंहिता संपुष्टात येईल. मतदान सुरळीत पार पडावे यासाठी पोलिसांकडून कडक सुरक्षा तैनात करण्यात येणार आहे.
या वेळेनंतर काय बंद राहणार?

रात्री १० वाजल्यापासून सभा, मोर्चे, ध्वनिक्षेपकाचा वापर, निवडणूक प्रचाराशी संबंधित जाहिरात प्रसिध्दी / प्रसारण या गोष्टींवर पूर्णपणे निर्बंध असतील. यापूर्वी ४ नोव्हेंबर २०२५ च्या एकत्रित आदेशात मतदान सुरू होण्यापूर्वी २४ तास अगोदर प्रचार बंद होईल, अशी तरतूद होती.

मात्र, अधिनियमातील तरतुदीशी सुसंगतता राखण्यासाठी आता हा बदल करण्यात आला असल्याचे सांगण्यात आले आहे. राज्य निवडणूक आयुक्त यांच्या आदेशानुसार, सचिव सुरेश काकाणी यांनी हे सुधारित आदेश गुरुवार (दि. 27) जारी केले होते.

काही ठिकाणच्या निवडणुका पुढे ढकलल्या?

दरम्यान, राज्यातील काही ठिकाणच्या निवडणुका आता २० डिसेंबर रोजी पार पडणार आहे. मंगळवारी होणारे मतदान आता पुढे ढकलण्यात आले आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या विविध आदेशांविरुद्ध काही उमेदवारांनी दाखल केलेल्या न्यायालयीन अपीलांमुळे काही नगरपरिषद व नगरपंचायतींची निवडणूक प्रक्रिया अडकली होती. अशा ठिकाणी आता २० डिसेंबरला मतदान आणि २१ डिसेंबरला मतमोजणी होणार असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.

या जिल्ह्यातील नगरपरिषदांची निवडणूक पुढे ढकलली

पुणे जिल्हा – बारामती सोलापूर जिल्हा – मंगळवेढा, वाशिम जिल्हा – वाशिम, रिसोड अकोला – बाळापूर सातारा जिल्हा – फलटण, महाबळेश्वर यवतमाळ जिल्हा – दिग्रस, पांढरकवडा, वणी अमरावती जिल्हा – अंजनगाव सुर्जी, रेणापूर ठाणे जिल्हा – अंबरनाथ अहिल्यानगर जिल्हा – कोपरगाव, देवळाली, नेवासा, पाथर्डी चंद्रपूर जिल्हा – घुग्गुस नांदेड जिल्हा – मुखेड, धर्माबाद.

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!