banner 728x90

भाजपची बीबीसीवर टीका, विरोधकांवरही साधला निशाणा

banner 468x60

Share This:

पीएम मोदी (PM Modi) आणि गुजरात दंगलीवर आधारित बीबीसीच्या माहितीपट (BBC Documentary) सीरिजचा वाद वाढत चालला आहे. आता या माहितीपटाची क्लिप आपल्या सोशल मीडिया हँडलवर शेअर करणाऱ्या विरोधी पक्षनेत्यांना भाजपने (BJP) जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. 2002 च्या गुजरात दंगलीचे (Gujarat Riots) राजकारण करण्याचा हा प्रयत्न असल्याचे भाजपने म्हटलं आहे.

भाजपने विरोधी पक्षांच्या नेत्यांना आठवण करून दिली की, पंतप्रधान मोदींना या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाकडून आधीच क्लीन चिट मिळाली आहे. या प्रकरणातील त्यांच्या निर्दोषत्वाला लोक न्यायालयातही मोठा पाठिंबा मिळाला आहे. एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना भाजप नेते अमित मालवीय म्हणाले, “गेल्या अनेक वर्षांपासून विरोधी पक्षांनी, विशेषत: काँग्रेसने दुर्दैवी गुजरात दंगलीचे राजकारण करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, यातून राजकीय फायदा मिळवण्याचे त्यांचे सर्व प्रयत्न असून सुप्रीम कोर्टात आणि जनतेच्या कोर्टात पंतप्रधान मोदींना न्याय मिळाला आहे.” 

banner 325x300

अमित मालवीय पुढे बोलताना म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयात निर्णय झालेल्या एखाद्या मुद्द्यावर बाहेरील एजन्सी (बीबीसी) काय म्हणते हे महत्त्वाचे का आहे. हा माहितीपट आपल्या देश आणि लोकांविरुद्ध पक्षपाती आहे. एक जुना वसाहतवादी जो स्वतःचा इतिहास विसरला आहे. त्यांनी आम्हाला कायद्याचे राज्य आणि मानवी हक्कांबद्दल उपदेश करू नये, असा टोलाही मालवीय यांनी लगावला आहे.

बीबीसीच्या माहितीपटावरून वाद

बीबीसीने ‘इंडिया: द मोदी क्वेशन’ नावाची माहितीपट सीरिज बनवली आहे. हा माहितीपट नरेंद्र मोदी गुजरात राज्याचे मुख्यमंत्री असताना 2002 मध्ये झालेल्या दंगलीवर आधारित आहे. ही डॉक्युमेंट्री सिरीज भारतात उपलब्ध करून देण्यात आली नव्हती, मात्र काही यूट्यूब चॅनलने ती अपलोड केली होती. शनिवारी, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या सूचनेनुसार या माहितीपटाचा पहिला भाग शेअर करणारे अनेक YouTube व्हिडिओ ब्लॉक करण्यात आले. भारताने या वादग्रस्त माहितीपटाचा निषेध केला आहे.

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!