banner 728x90

एक बडा नेता सत्तेतून बाहेर पडणार? महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप; केंद्रबिंदू दिल्लीत

banner 468x60

Share This:

महाराष्ट्राच्या राजकाराणात पुन्हा मोठा भूकंप होणार आहे. महाराष्ट्रात होणाऱ्या या राजकीय भूकंपाचा केंद्रबिंदू दिल्लीत आहे. विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीपासून दूर गेलेले महादेव जानकर आता नवीन घरोबा करणार आहेत.

इंडिया आघाडीसोबत जानकर जाणार असल्याची माहिती आहे. मी सध्या महायुती, एनडीएसोबत नाही, असे सूचक विधान जानकर यांनी केले. त्यामुळे जानकर मोठा निर्णय घेण्याच्या तयारी असल्याचं स्पष्ट आहे.

banner 325x300

राष्ट्रीय समाज पक्षाचे सर्वेसर्वा महादेव जानकर आता महायुतीला रामराम करणार आहेत. राज्यातील विधानसभा निवडणुकीनंतर जानकर नाराज असल्याचं वारंवार पाहायला मिळाले.आतातर ते नवा घरोबा करण्याच्या तयारीत दिसत आहेत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती कार्यक्रमाच्या निमित्ताने महादेव जानकर यांनी दिल्लीत शक्तीप्रदर्शनाची जोरदार तयारी चालवली आहे.

या कार्यक्रमासाठी राहुल गांधी, शरद पवार आणि अखिलेश यादवांना निमंत्रित करत पुढील राजकीय वाटचालीबाबत स्पष्ट संकेत दिले आहेत. आम्ही सध्या महायुती, एनडीएसोबत नाही. मी सध्या नवीन घरोबा करण्याच्या तयारीत आहे, असे सूचक विधान करत महादेव जानकर यांनी मोठा निर्णय घेण्याच्या तयारी असल्याचे स्पष्ट केले आहे आणि त्याबाबतची घोषणा त्यांनी थेट दिल्लीतून केली आहे.

राष्ट्रीय समाज पक्षाला सन्मानपूर्वक जागा दिल्या तरच आम्ही इंडिया आघाडीसोबत जाण्यास तयार आहोत. ज्या ठिकाणी विजयाची खात्री आहे, त्याच जागा मागण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. लवकरच त्याबाबतची चर्चा सुरू होईल, असं जानकर म्हणाले.

दरम्यान आपण कोणत्या पक्षात जाईल हे जानकार यांना माहीत नसते, पण अखेर ते महायुतीतच येतील, ते स्वतःच वाटोळ करून घेणार नाही, असा विश्वास मंत्री संजय शिरसाट यांनी व्यक्त केला आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर गेल्या अनेक वर्षांपासून राज्यातील युती सरकारसोबत आहेत.आता मात्र आपल्याला दुर्लक्षित केल्याची भावना जानकर यांच्या मनात आहे. आता जानकर महायुतीला रामराम करत आहेत. सध्या महायुतीत इतर पक्षांची गर्दी पाहता, युतीला फारसा फरक पडणार नाही. मात्र, आघाडीसोबत गेल्याने महादेव जानकर यांच्या पदरी काय पडेल हे पाहावं लागेल.

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!