banner 728x90

आता अमरावती ते मुंबई फक्त दोन तासांत, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विमानतळाचं लोकार्पण

banner 468x60

Share This:

अमरावतीकरांसाठी एक मोठं गिफ्ट देण्यात आलं आहे. आज अमरावतीमध्ये विमानतळाचा लोकार्पण सोहळा पार पडला. अमरावती विमानतळाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज उद्घाटन करण्यात आलं.

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे देखील हजर होते. अमरावती विमानतळाची निर्मिती 1992 मध्ये झाली होती. 1992 मध्ये विमानतळ फक्त व्हीआयपी व्यक्तींसाठी सुरू होतं. मात्र आता सर्वसामान्य लोकांना विमानतळावरून प्रवास करता येणार आहे.

banner 325x300

अमरावती विमानतळाच्या धावपट्टीची लांबी 1850 मीटर असून 45 मीटर रुंद आहे.आशियातील सर्वात मोठं एअर इंडियाचं वैमानिक प्रशिक्षण केंद्र इथे उभारलं जाणार आहे.विमानतळावर एकाच वेळी ATR/72 सीटर अशी दोन विमान पार्किंग होऊ शकतात.ऑक्टोबर महिन्यात विमानतळावरून नाईट लँडिंग सुरू होणार आहे.

अमरावती विमानतळाचे फायदे काय?

  1. अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वाशीम मधील नागरिकांना मुंबईत लवकर पोहोचता येईल.
  2. मुंबईला जाण्यासाठी याआधी अमरावतीहून नागपुरात जावे लागायचे.
  3. विमानतळ उड्डाण योजनेअंतर्गत असल्याने तिकीट सर्वसामान्यांना परवडणार असणार.
  4. अमरावतीहून मुंबईला जाण्यासाठी रेल्वेने 12 तास लागत होते, विमानाने पाऊणे दोन तास लागणार.
  5. आठवड्यातून 3 दिवस म्हणजे सोमवारी, बुधवारी आणि शुक्रवारी अमरावतीहून मुंबई हे विमान जाणार.
  6. विमानसेवेमुळे अमरावतीच्या दळणवळणाचा चांगला विकास होणार.

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!