मुंबई : अॅग्रिस्टॅक योजनेच्या माध्यमातून कृषी विभागाचा डेटा आणि डिजिटल सेवेचा वापर करून राज्य सरकार विविध योजनांचा लाभ पात्र शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवला जात आहे. आजपासून ही योजना संपूर्ण राज्यभरात राबवली जाणार आहे.
लातूरमध्ये प्रत्येक तालुक्यात 16 ते 31 डिसेंबरपर्यंत ग्राम सभांसमवेत शिबिरांचे आयोजन केले जाणार आहे. अॅग्रिस्टॅक योजनेमुळे योजनांच्या कारभारामध्ये पारदर्शकता येणार आहे.
दरम्यान, केंद्र सरकार डिजिटल पद्धतीचा वापर करून शेतकऱ्यांपर्यंत योजना पोहोचवण्यासाठी सरकार अॅग्रिस्टॅक योजना राबण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे योजनेत पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे. सोमवारपासून या योजनेला राज्यभरात सुरवात होणार आहे. या योजनेमार्फत प्रत्येक गावात गावनिहाय अभियान राबवले जाणार आहे. केंद्र सरकारने अॅग्रिस्टॅक योजना योजनेसंदर्भातील मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत.
अॅग्रिस्टॅक योजनेमुळे शेतकऱ्यांना कोणते फायदे मिळणार?
अॅग्रिस्टॅक योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना पीक कर्ज, पीएम किसान योजना आणि पीक विम्यासह सर्व सरकारी योजनांचा लाभ सहज मिळेल. यासाठी देशभरात शेतकरी नोंदणी कार्यक्रमाला गती देण्यात येत आहे. या कार्यक्रमात खसरा, खतौनी या शेतकऱ्यांच्या नोंदी त्यांच्या आधारशी जोडल्या जाणार आहेत. याचा शेतकऱ्यांना खूप फायदा होईल कारण त्यांना सरकारी योजनांसाठी पुन्हा पुन्हा केवायसी करण्याची गरज भासणार नाही.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना प्रथम नोंदणी करावी लागणार आहे. अहवालानुसार शेतकऱ्यांना हे काम 31 डिसेंबर 2024 पूर्वी पूर्ण करावे लागणार आहे. यासाठी तुम्ही विभागाच्या https://upfr.agristack.gov.in या वेब पोर्टलवर जाऊ शकता किंवा तुमच्या जवळच्या नोंदणी शिबिरात किंवा ग्राम पंचायतमध्ये भेट देऊनही नोंदणी करू शकता.