आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत्या काही महिन्यांवर म्हणजेच दिवाळीच्या आसपास होणार असल्याची दाट शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षातने कंबर कसली असून, राज्यातील विविध भागात स्वतः पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार जाऊन पक्षातील पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करत आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेश होत आहेत. नुकतेच बुलढाणा व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला असून, यावेळी अजित पवार यांनी त्यांचे स्वागत करत पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना कानमंत्र दिला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कामात स्वतःला झोकून द्या, समन्वयाने कामं करा तसेच सभासद नोंदणी मोठ्या प्रमाणावर करण्याच्या सूचना यावेळी अजित पवारांनी दिल्या.
काय म्हणाले अजित पवार?
महायुतीच्या सरकारमध्ये राष्ट्रवादी पक्ष म्हणून काम करत असताना विकासाच्या बाबातीत महाराष्ट्र पुढं गेला पाहिजे. स्वर्गीय यशंवतराव चव्हाण साहेबांनी जे संयुक्त महाराष्ट्राची मेहूर्तमेढ रोवलेली आहे. त्यांनी जो विचार ठेवला, सर्व जाती धर्मांतील व्यक्तींना सोबत घेऊन जायचा त्या पद्धतीने आमच्या सर्वांचे काम चाललंय असल्याचे अजित पवार म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील कार्यकर्त्यांनी काम करत असताना ग्रामीण भागातील प्रश्नांबरोबर शहरी भागतील प्रश्न हे पण व्यवस्थितपणे सोडवले गेले पाहिजे, शहरी भागातील नागरिकांना वाटलं पाहिजे की हा पक्ष आमच्यासाठीही काम करतोय, असे अजित पवारांना सांगितले. यावेळी बोलताना त्यांनी विरोधकांनाही लक्ष केले. विरोधकांकडे काही मुद्दा राहिला नसल्याने हिंदी मराठीचा मुद्दा काढायचा आणखी काही मुद्दे काढायचे असे ते म्हणाले.
मित्रोंनो वेगवेगळ्या भागातील प्रश्न वेगवेगळे आहेत. आपण परिवार म्हणून काम करायचं आहे, आपल्यामध्ये कुठेही हेवेदावे होता कामा नये, कोणताही भेदभाव केला नाही पाहिजे, असा कानमंत्र अजित पवारांनी यावेळी बोलताना पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिला. नव्या चेहऱ्यांना संधी दिली पाहिजे, असेही ते म्हणाले.