मुंबई: 26 जानेवारी निमित्ताने आणि मुंबईतील सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून पोलिसांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यात 23 जानेवारीपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश देण्यात (Alert in Mumbai) आले आहे.
शहरातील शांतता आणि सार्वजनिक व्यवस्था कायम ठेवण्यासाठी पोलिसांनी 23 जानेवारीपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे. या आदेशामध्ये 5 किंवा त्यापेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली आहे. 26 जानेवारीच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय महत्वाचा मानला जात आहे.
सुरक्षा व्यवस्था बळकट
मुंबई शहरामध्ये अनेक वेळा शांततेचा भंग आणि सामाजिक असंतोष होऊ नये यासाठी पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे. पोलिस प्रशासनाने विविध धार्मिक, सामाजिक आणि राजकीय घटनांच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्था बळकट करण्यासाठी हा नियोजन केला आहे.
रात्री पाळीला गस्तफेरी वाढवली
यामध्ये विशेषत: स्थानिक भागात पोलीस यंत्रणाला अलर्ट मोडवर केला असून मुंबईत रात्री पाळीला गस्तफेरी वाढवली आहे. ज्या ठिकाणी अनुशासन व शांतता भंग होईल त्याठिकाणी तत्काळ कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहे.
जमाव एकत्र होणे टाळण्यासाठी हा उपाय
शहरात शांतता स्थापन करणे आणि नागरिकांची सुरक्षा सुनिश्चित करणे पोलिसांचा एकमेव उद्दिष्ट आहे. नवीन वर्षात साजरे होणारे सण-उत्सव आणि सार्वजनिक ठिकाणी पार पडणाऱ्या कार्यक्रमात काही संवेदनशील भागात अचानक होणारे गोंधळ किंवा मोठ्या प्रमाणावर जमाव एकत्र होणे, टाळण्यासाठी हा उपाय करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी आदेशात दिली आहे.
विविध भागांमध्ये कडेकोट बंदोबस्त
महाराष्ट्रसह मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्था चोक ठेवण्यासाठी हा निर्णय योग्य असल्याचा बोलले जात आहे. या आदेशांच्या निर्णयामुळे संभाव्य हिंसाचार किंवा सामाजिक विद्वेषाच्या घटनांना आळा घालण्यास मदत मिळणार आहे. या आदेशाच्या पार्श्वभूमीवर, पोलिसांनी याची योग्य अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी विविध भागांमध्ये कडेकोट बंदोबस्त केली आहे.
23 जानेवारीपर्यंत हा आदेश लागू
पोलिस प्रशासनाचे निर्देशनुसार सार्वजनिक ठिकाणी नागरिकांनी कोणतेही अनुशासन किंवा नियम मोडल्यास कठोर कारवाई करण्यात येणार आहे. 9 जानेवारीच्या मध्यरात्रीपासून ते 23 जानेवारीपर्यंत हा आदेश लागू राहणार आहे.