banner 728x90

अमेरिकतील मराठी शाळांना महाराष्ट्र शासन अभ्यासक्रम पुरवणार, आशिष शेलार यांचे आश्वासन

banner 468x60

Share This:

अमेरिकेतील मराठी शाळांना महाराष्ट्र शासनातर्फे अभ्यासक्रम देऊ, असे आश्वासन राज्याचे माहिती तंत्रज्ञान तथा सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी दिले आहे. अमेरिका दौऱ्यावर असणाऱ्या आशिष शेलार यांनी कॅलिफोर्निया राज्यातील सॅन फ्रान्सिस्को येथील बे एरिया येथे मराठी शाळा चालवणाऱ्या महाराष्ट्र मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतली.

सेवा भावाने एकत्र आलेली मराठी माणसे आपल्या मुलांना मराठी भाषा, संस्कृती, इतिहास आणि आपल्या महाराष्ट्रातील लोकपरंपरा शिकवून “मराठीचा संस्कार” आपल्या नव्या पिढीवर व्हावा म्हणून इथे शाळा चालवतात. सन 2005 पासून ही शाळा चालवली जात आहे. सुमारे 300 विद्यार्थी इथे मराठीमध्ये शिक्षण घेत आहेत.

banner 325x300

अमेरिकेत अशा 50 हून अधिक शाळा या मराठीच्या असून इथली मराठी माणसे या शाळा चालवत आहेत. अमेरिकेतील स्थानिक प्रशासनाला जर महाराष्ट्र शासनाने शिफारस केली तसेच अभ्यासक्रम उपलब्ध करुन दिला तर मराठी भाषा शिकवणे, परीक्षा व प्रमाणपत्र विद्यार्थ्यांना देणे सुलभ होईल, असे या शाळेच्या पदाधिकाऱ्यांनी या भेटीत लक्षात आणून दिले.

दरम्यान याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याशी चर्चा करुन महाराष्ट्र शासनाचे आवश्यक ते सहकार्य व शिफारस, अभ्यासक्रम नक्की देईल, असे आश्वासन मंत्री शेलार यांनी अमेरिकेतील महाराष्ट्र मंडळाला दिले आहे.

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!