महाविकास आघाडीच्या अडीच वर्षाच्या काळात मराठा समाजासाठी घेतलेला एक निर्णय त्यांनी दाखवावा. आता काही जण आंदोलकांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपला फायदा करायचा प्रयत्न करत आहेत; पण त्यांचे नुकसानच होईल, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी माध्यमांशी बोलताना केली.
फडणवीस म्हणाले की, लोकशाही मार्गान होत असलेल्या कोणत्याही आंदोलनाला आमची ना नाही. लोकशाही मार्गाने, न्यायालयाने आखून दिलेल्या चौकटीत जर कोणी आंदोलन करत असेल तर त्या आंदोलकांसोबत चर्चा करण्याची आमची पूर्ण तयारी आहे. मराठा समाजाला आरक्षण आम्हीच दिले. मराठा समाजाचे प्रश्न आमच्याच सरकारने सोडविले आहेत. यापुढेही सोडवणार आहोत. मराठा समाजाच्या हिताचा विचार करताना ओबीसी समाजाच्या हक्कांचाही आम्ही विचार करतो. आम्ही कधीच दोन समाजांना समोरासमोर आणणार नाही. मराठा, ओबीसी अशा सर्वच समाजांच्या हिताचा विचार करूनच सर्व निर्णय करू,
‘आकडेवारीचा अभ्यास करा’
मुळात मराठा समाजाचे प्रश्न आम्हीच सोडविले. मराठा समाजाला आम्हीच आरक्षण दिले. देशभरात जी आआंदोलने सुरू होती ती आता ईडब्ल्यूएस लागू झाल्यानंतर बरीच कमी झाली आहेत. ओबीसीत मागणी केली तर ओबीसीमध्येच साडेतीनशे आती आहेत. मेडिकलच्या अॅडमिशनमध्ये ओबीसी कटऑफ लिस्ट एसईबीसीच्या वर आहे. त्यामुळे या मागणीने कोणाचे भले होणार याची कल्पना नाही. मराठा समाजाच्या हितासाठी आकडेवारीचा अभ्यास करून मागणी करावी, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. राजकीय आरक्षण हेतू असेल तर गोष्ट वेगळी. पण सामाजिक आर्थिवा परिवर्तनाची लढाई असेल तर विचारवंतांनी विचार केला पाहिजे. आंदोलनामागे कोणाचे पाठ्यळ आहे, हे दिसते. काही राजकीय पक्ष त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपला फायदा करून घेत आहेत, पण यामुळे त्यांचेच नुकसान होणार आहे, असेही ते म्हणाले.
आता जे राजकीय विरोधक आरक्षणाबाबत तीढ़ वर करून बोलत आहेत त्यांनी आधी त्यांच्या अडीच वर्षांच्या काळात काय केले याचा आस्सा पाहावा. मराठा असो वा ओबीसी अशा सर्वच समाजाच्या हिताचे रक्षण करण्यात येईल. जे आंदोलक लोकशाहीच्या मागनि आआंदोलन करतील त्यांच्याशी निश्चितच आम्ही चर्चा करू, आता तर उच्च न्यायालयानेच चौकट आखून दिली आहे.
– देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री