राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर महापालिका निवडणुकीचं वारं वाहू लागलं आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आलं आहे. एकिकडे भाजप आगामी निवडणुकांसाठी राज ठाकरेंची साथ घेणार असल्याची चर्चा रंगली आहे.
तर दुसरीकडे दोन्ही ठाकरे भाऊ पुन्हा एकत्र येणार या चर्चेनं उत आला आहे. अशातच, राज ठाकरेंसोबतच्या हातमिळवणीवर ठाकरे गटाचे युवानेते यांनी भाष्य केलं आहे.
पुण्यात दोन दिवसांपूर्वी दोन्ही भाऊ एकत्र येण्यासाठी विनंती वजा मागणीचं पोस्टर शिवसेना नेत्यांनी झळकावले होते. दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी राज ठाकरेंसोबत जाण्याची भूमिका माध्यमांसमोर स्पष्ट केली आहे.
काय म्हणाले आदित्य ठाकरे?
एका शोमध्ये आदित्य ठाकरे बोलत होते. गेल्या दोन अडीच वर्षापासून आमचा लढा सुरु आहे. आम्ही भूमिका बदलेली नाही. ‘आम्ही रात्री हूडी घालून मुख्यमंत्र्यांना भेट नाही’ असा टोला मुख्यमंत्री फडणवीसांना लगावत ठाकरे पुढे म्हणाले, सर्वासमोर मुख्यमंत्र्यांना भेटतो. सर्व मागण्या मीडियासमोर आम्ही मांडतो. पण काही पक्ष बिनशर्त पाठिंबा देतात. कशी स्वबळावर लढतात. पण आमची भूमिका स्पष्ट आहे.
आम्हाला फोडायचा प्रयत्न करत रहा. पण आम्ही राज्यासाठी लढणार आहोत. कितीही वार केलात तरी आमचा महाराष्ट्रासाठी आवाज थांबणार नाही. पण जोपर्यंत ते राज्याच्या हिताचे बोलत नाहीत. तोपर्यंत आम्ही समजोता करु शकत नाही. कधी कधी त्यांच्याकडून पुढाकार घेतला जातो. मात्र, महाराष्ट्राच्या हिताचा विचार नाही. जो देश, संविधान जपेल आणि भूमिकेत सातत्य दाखवेल त्यांच्यासोबतच आम्ही जाऊ…अस आदित्य ठाकरेंनी यावेळी ठणकावून सांगितलं.