आयपीएल 2025 च्या फायनल सामन्यात आरसीबीने पंजाबचा पराभव करत पहिल्यांदाच आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरले. यानंतर चेन्नईच्या चिन्नस्वामी स्टेडियमवर या विजयाचं सेलिब्रेशन करण्यात आले.
मात्र यादरम्यान मोठ्या प्रमाणात चेंगराचेंगरी झाली आणि जवळपास 11 लोकांचा मृत्यू झाला तर 50 हुन अधिक लोकं जखमी झाले. या दुर्दैवी घटनेनंतर या कार्यक्रमाचे आयोजक, पोलिसांची सुरक्षा व्यवस्था इत्यादी सगळ्यावर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले.
बीसीसीआयकडून नवे नियम जारी
बंगळुरू चेंगराचेंगरीनंतर बीसीसीआयने नवीन नियम जाहीर केले आहेत. बीसीसीआय सचिव देबजीत सैकियाने स्पष्ट केले की, हे नियम आयपीएलनंतर विजयोत्सव साजरा करणाऱ्या सर्व संघांसाठी बंधनकारक असतील. सैकियाने पहिले हे स्पष्ट केले की बीसीसीआय अशा कार्यक्रमांच्या आयोजनाविषयी प्रोटोकॉल लागू करण्याचा विचार करत आहेत. सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वांचा मसुदा तयार करण्यासाठी आणि त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी मंडळाने तीन -सदस्यांची समिती स्थापन केली आहे.
काय आहेत नवीन नियम?
1. ट्रॉफी जिंकल्यावर 3 ते 4 दिवसांमध्ये कोणताही संघ विजयोत्सवाचे आयोजन करू शकणार नाही.
2. त्वरित आणि कार्यक्रमाचे खराब व्यवस्थापन टाळण्याची कोणत्याही कार्यक्रमाला लगेचच परवानगी दिली जाणार नाही.
3. बीसीसीआयकडून लेखी परवानगीशिवाय कोणताही कार्यक्रम आयोजित केला जाऊ शकत नाही.
4. कार्यक्रमाच्या आयोजनापूर्वी बीसीसीआयकडून औपचारिक परवानगी घ्यावी लागेल.
5. 4 ते 5-स्तरीय सुरक्षा प्रोटोकॉल अनिवार्य असतील.
6. सर्व ठिकाणी आणि रहदारी दरम्यान बहु-स्तरीय सुरक्षा उपस्थिती आवश्यक असेल.
7. सुरक्षायंत्रणेत विमानतळापासून कार्यक्रमस्थळापर्यंत संघाच्या हालचालीचा समावेश करावा लागेल.
8. कार्यक्रमाच्या वेळापत्रकात खेळाडू आणि कर्मचार्यांची संपूर्ण सुरक्षा सुनिश्चित करणे.
9. जिल्हा पोलीस, राज्य सरकार आणि स्थानिक अधिकाऱ्यांकडून परवानगी घेणं गरजेचं असणार आहे.
10. सर्व कार्यक्रमांना कायद्यानुसार आणि सुरक्षित रूपाने पुढे नेण्यासाठी नागरिक आणि कायद्याची अंमलबजावणी करणार्या संस्थांची मंजुरी घेणे आवश्यक असणार आहे.