banner 728x90

मोठी बातमी! राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड

banner 468x60

Share This:

BJP Leader MLA Rahul Narvekar Elected as Assembly Speaker : राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आलीय. भाजप नेते आणि आमदार राहुल नार्वेकर यांची (Rahul Narvekar) विधानसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत विधिमंडळ सदस्य ॲड. राहुल नार्वेकर यांनी आज विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज (Assembly Speaker election) दाखल केला होता.

banner 325x300

याप्रसंगी विधिमंडळ सदस्य तथा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, सदस्य चंद्रकांतदादा पाटील हे उपस्थित होते. आज दुपारी बारा वाजेपर्यंत विधानसभा अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करण्यासाठी मुदत देण्यात आली होती. मात्र दुपारी बारापर्यंत केवळ भाजपकडून राहुल नार्वेकर यांचाच अर्ज दाखल झालेला होता. राहुल नार्वेकर यांच्याविरोधात विरोधी पक्षाकडून कोणताही अर्ज दाखल झालेला नव्हता. त्यामुळे भाजपचे राहुल नार्वेकर यांची पुन्हा एकदा विधानसभेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे.

राहुल नार्वेकर यांच्याविरोधात कोणताही अर्ज दाखल झालेला नाही, त्यामुळे विधानसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड होणार असल्याचं निश्चित मानलं जात होतं. उद्या राहुल नार्वेकर यांच्या निवडीची अधिकृत घोषणा केली जाणार आहे. दरम्यान भाजपचे ज्येष्ठ नेते कालिदास कोळंबकर यांची हंगामी विधानसभा अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आलेली आहे. मुदतीत महाविकास आघाडीकडून एकही उमेदवारी अर्ज आला नसल्याने नार्वेकरांच्याच नावावर शिक्कामोर्तब झाल्याचं समोर आलंय.

उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल नार्वेकर म्हणाले होते की, आमच्या भाजप पक्षाच्या सर्वोच्च नेत्यांचे आभार. त्यांनी विश्वास दर्शवला पुन्हा एकदा संधी दिली, त्यामुळे आभार मानतो. पूर्ण विश्वासाने ही जबाबदारी पार पाडेल, असं आश्वासन देखील त्यांनी पक्षश्रेष्ठींना दिलं आहे. जनतेने दिलेल्या बहुमताचा अपमान झाला नाही पाहिजे, असं प्रतिपादन देखील राहुल नार्वेकर यांनी केलंय.

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!