banner 728x90

भाजपच्या पालघर जिल्हाध्यक्षपदी भरत राजपूत यांची निवड?

banner 468x60

Share This:

पालघर-योगेश चांदेकर

पालघरः राज्यातील भाजपच्या ५८ जिल्हाप्रमुख पदांपैकी बहुतांश ठिकाणी भाजपने भाकरी फिरवून पदांवर नव्या पदाधिकाऱ्यांची वर्णी लावली असताना पालघर जिल्ह्यामध्ये मात्र पक्षाने पुन्हा एकदा भरत राजपूत यांची जिल्हाध्यक्ष पदाची निवड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाजपच्या जिल्ह्यातील बहुतांश पदाधिकाऱ्यांनी राजपूत यांचीच मागणी केल्याने आणि तसे मतदान केल्याने त्यांची जिल्हाध्यक्षपदी पुन्हा निवड झाली आहे असेही संभ्रम निर्माण झाले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपाला यश मिळवून देण्यासाठी ही निवड मानली जाऊ शकते.

banner 325x300

पालघर जिल्ह्यात भाजपची पाळेमुळे पूर्वीपासून आहेत; परंतु आता सर्वच निवडणुकांमध्ये भाजपला चांगले यश मिळत आहे. त्याचे कारण शहरांबरोबरच भाजप ग्रामीण भागातही वाढला आहे आणि त्यात भरत राजपूत यांचे मोठे योगदान आहे. राजपूत यांच्या जिल्हाध्यक्षपदाच्या काळात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका झाल्या. पालघर हा शिवसेनेचा बालेकिल्ला असतानाही राजपूत यांच्या आग्रहामुळेच पालघर लोकसभा मतदारसंघ शिवसेनेकडून भाजपकडे घेण्यात आला आणि या मतदारसंघावर भाजपचे वर्चस्व आहे हे दाखवून देण्यात राजपूत यशस्वी होतील.

लोकसभेत भाजपने दाखवली ताकद
लोकसभेच्या निवडणुकीत डॉ. हेमंत संवरा यांना पावणेदोन लाख मतांनी मिळालेल्या विजयमागे श्रेष्ठींची जशी व्यूहनीती नीती होती, तशी स्थानिक पातळीवर राजपूत यांनी केलेली व्यूहनीतीही महत्त्वाची होती. त्यांच्याच आग्रहामुळे भाजपने हा मतदारसंघ शिवसेनेच्या शिंदे गटाकडून भाजपकडे घेतला होता. विधानसभेच्या निवडणुकीच्या काळातही राजपूत यांनी सुरुवातीपासूनच पालघर जिल्ह्यातील सर्वच विधानसभा मतदारसंघात विजय मिळवू, असा दावा केला होता. त्या दृष्टीने शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यातील मित्र पक्षांसोबत अतिशय समन्वयाने त्यांनी काम केले.

पाच मतदारसंघात महायुतीचे आमदार
डहाणू विधानसभा मतदारसंघ वगळता उर्वरित सर्वच विधानसभा मतदारसंघात महायुतीला यश मिळाले. प्रामुख्याने विक्रमगड, बोईसर, वसई-विरार पालघर, डहाणू आदी सहापैकी पाच विधानसभा मतदारसंघात महायुतीचे आमदार निवडून आले. , वसई-विरार परिसरातील भाई ठाकूर यांच्या साम्राज्याला भाजपने भगदाड पाडले. त्यात राजपूत यांच्या खेळीचा मोठा वाटा आहे.

१९ पैकी १७ पदाधिकाऱ्यांचा कौल राजपूत यांच्या मागे
या पार्श्वभूमीवर भाजपच्या जिल्हाध्यक्ष पदाच्या निवडीसाठी जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. मनोर येथे झालेल्या या बैठकीला निरीक्षक म्हणून आमदार राजन नाईक आणि माजी मंत्री जगन्नाथ पाटील हे उपस्थित होते. भाजपच्या जिल्हाध्यक्ष पदाच्या शर्यतीत पुन्हा भरत राजपूत आघाडीवर होते; परंतु नंदकुमार पाटील यांनाही जिल्हाध्यक्ष होण्याची इच्छा होती. त्यानुसार निरीक्षकाच्या उपस्थितीत जिल्हा पदाधिकाऱ्यांची मते जमवण्यात आली. १९ पैकी १७ सदस्यांनी राजपूत यांच्या पाठीशी आपले मत नोंदवल्याने त्यांची पुन्हा एकदा भाजपच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाली. बेरजेचे राजकारण करणारे आणि कार्यकर्त्यांच्या सुखदुःखात धावून जाणारे असल्याने राजपूत यांच्या निवडीने कार्यकर्त्यांचा उत्साह द्विगुणित होईल.

कोट
जिल्हाध्यक्ष पदाची  निवड झाल्याबत भरत राजपूत यांना विचारणा केली असता  भरत राजपूत यांनी सदर  निर्णय हा प्रदेश कार्यालयाचा असून तशी अधिकृत यादी निश्चित झाली नसल्याचे सांगत कोणी तरी निवड झाल्याबाबतची यादी चुकीच्या पद्धतीने सोशल मीडियावर टाकली असून संभ्रम निर्माण झाला आहे. जिल्हाध्यक्ष निवड प्रक्रियेचा निर्णय सर्वता पक्षश्रेष्टीचा आहे.
भरत राजपूत, माजी जिल्हाध्यक्ष, भाजप, पालघर

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!