Breaking News
‘भाजप जिल्हाध्यक्षांच्या बदनामीवरून महायुतीत तणाव’ शिवसेनेच्या शिंदे गटाविरुद्ध भाजप आक्रमक थेट बोईसर पोलीस ठाण्यात तक्रार राजीव नानांच्या पुढाकाराने ‘प्रोटेक्ट एन. जि.ओ.’पालघर जिल्ह्याचे हित जपणार. भरत राजपूतच पालघरचे ‘किंगमेकर’ पालघर जिल्ह्यात भाजपला मिळवून दिल्या ९४ पैकी पन्नास जागा विरोधकांच्या एकीलाही शह राज -उद्धव ठाकरे एकत्र, आज दुपारी ऐतिहासिक युतीची घोषणा, जागावाटप ठरलं, कोण किती जागांवर लढणार? वाचा मोठी बातमी! दहावी-बारावीच्या परीक्षेत पर्यवेक्षकांच्या मोबाईलचेही सुरु राहणार कॅमेरे; प्रत्येक वर्गात असणार सीसीटीव्ही, यंदा प्रथमच पर्यवेक्षकांची सरमिसळ
banner 728x90

BJP Vs Shivsena: महायुतीमधील फोडाफोडीवर नागपूरमध्ये तह, देवेंद्र फडणवीसांची एकनाथ शिंदे-अजितदादांशी चर्चा, रवींद्र चव्हाणांना महत्त्वाची सूचना

banner 468x60

Share This:

महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकांदरम्यान सत्ताधारी महायुतीमध्ये (Mahayuti) मोठी फूट पडल्याचेचित्रबघायलामिळालं आहे. महायुतीतमोठ्या भावाच्याभूमिकेतअसलेला भाजप (BJP) आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील दरी इतकी वाढली होती की दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे निवडणुका लढवू शकतात, अशा चर्चे नं जोर धरला होता . एकंदरीत या सर्व राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमि वर महायुतीच्या गोटातून एक महत्वपूर्ण माहिती समोर आली आहे . मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), उपमुख्यामंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यात रात्री उशिरा एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडल्याची माहिती आहे . महापालिका निवडणुकांसाठी महायुती च्या प्रमुखां मध्ये हि बैठक पार पडलीय . मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या रामगिरी निवासस्थानी सोमवारी रात्री भाजप सह महायुतीच्या प्रमुख नेत्यां मध्ये ही बैठक पार पडली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय सहसंघटनमंत्री शिवप्रकाश, राज्याचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार यांच्यासह काही मोजक्या प्रमुख नेत्यांची या बैठकीला उपस्थिती असल्याची माहितीआहे. येऊ घातलेल्या महापालिका निवडणुका आणि स्थानिक पातळीवर होणाऱ्या समीकरणांबाबत भाजप नेत्यांमध्येही चर्चा झाल्याचीही माहिती आहे. महायुतीत अधिक वाद होऊ नयेत यासाठी नेतृत्वाकडून भाजप नेत्यांना निर्देश देण्यातआलेआहे. सोमवारी रात्री झालेल्या बैठकीत दोन्ही मित्रपक्षांमधील संबंध अधिक चांगले होत असल्याचे दिसून येत आहे. तर रात्री उशिरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह प्रमुख नेत्यांमध्येही बैठक पारपडलीय.

banner 325x300

दरम्यान, महायुतीमध्ये पक्षप्रवेशावरून सुरू असलेल्या वादावरहीया बैठकीत चर्चा झाल्याची माहितीआहे. पक्षप्रवेश करून घेताना महायुती आणि मित्रपक्ष दुखावले जाणार नाही, याचा प्रत्येकाने विचार करा, अशासूचना मुख्यमंत्र्यांनी महायुतीच्या नेत्यांना दिल्याआहेत. त्यामुळेआता महायुतीमधील फोडाफोडीवर नागपूरमध्ये तह झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात केली जात आहे. तर देवेंद्र फडणवीसांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजितदादांशी झालेल्या या चर्चेनंतर महायुतीतील नाराजी नाट्य दूर होईलका? हे पाहणे महत्वाचे ठरणारआहे.

महापालिका निवडणुका महायुती म्हणून संयुक्तपणे लढवण्याचा निर्णय?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी सोमवारी (8 डिसेंबर) उशिरा नागपुरात बंद दाराआड बैठक घेतली. जवळजवळ दीड तासाच्या चर्चेनंतर, महाराष्ट्रातील महापालिका निवडणुका महायुती म्हणून संयुक्तपणे लढवण्याचा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह चंद्रशेखर बावनकुळे आणि रवींद्र चव्हाण हे देखील बैठकीत उपस्थित होते. या बैठकीत मुंबई आणि ठाण्यासह महाराष्ट्रातील महापालिका निवडणुका महायुतीचा भाग म्हणून लढवण्याच्या शक्यतेवर सकारात्मक चर्चा झाल्याचीहीमाहितीआहे.

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!