banner 728x90

जव्हारमध्ये दोन तलाठी २० हजारांची लाच घेताना अटक

banner 468x60

Share This:

जव्हार, संदीप साळवे

जव्हार ग्राम महसूल अधिकारी गजानन नगोरे जोहरे (सजा–जामसर) व सिताराम विष्णू इंगम (सजा–हिरडपाडा), ता. जव्हार, जि. पालघर यांना प्रत्येकी १० हजार रुपये अशी एकूण २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक पालघर विभागाने रंगेहात पकडले. ही कारवाई मंगळवारी (दि. ११) दुपारी जव्हार येथे करण्यात आली.
तक्रारदाराच्या नावावर प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजूर झाले आहे. या घरकुलाच्या बांधकामासाठी तक्रारदाराने नवीन ट्रॅक्टर खरेदी केला होता. संबंधित ग्राम महसूल अधिकाऱ्यांनी ट्रॅक्टर जप्त न करण्यासाठी तसेच कामात अडथळा न आणण्यासाठी प्रत्येकी १० हजार रुपये अशी एकूण २० हजार रुपयांची मागणी केल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पालघर येथे करण्यात आली होती.
तक्रारीची पडताळणी करून सापळा रचण्यात आला. त्यानुसार मंगळवारी दुपारी तक्रारदाराकडून २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना दोन्ही अधिकाऱ्यांना रंगेहात पकडण्यात आले. या प्रकरणी जव्हार पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा १९८८ (सुधारित अधिनियम २०१८) कलम ७, ७-अ व १२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पालघर पोलिस अधीक्षक दादाराम करांडे, ठाणे पोलीस अधीक्षक शिवराज पाटील, ठाणे अपर पोलिस अधीक्षक भागवत सोनवणे , ठाणे तथा लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पुढील तपास सुरू आहे.

banner 325x300

“लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागरिकांच्या सहकार्याने भ्रष्टाचाराविरोधात प्रभावीपणे काम करत आहे. प्राप्त तक्रारींची कायदेशीर चौकशी करून योग्य ती कारवाई केली जात आहे, त्यामुळे निर्भयपणे तक्रारी कराव्यात”
“लाच मागणारा किंवा स्वीकारणारा कोणीही असो तो कोणत्याही परिस्थितीत सुटणार नाही. कायद्याची अंमलबजावणी निर्भयपणे केली जाईल,” त्यासाठी पालघर युनिट चा व्हाट्स अँप मोबाईल नंबर वर 8857971064 संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!