अक्कलकोट- श्रीशैल गवंडी
श्रीकांत भारतीय यांनी घेतले श्री स्वामी समर्थांचे दर्शन महाराष्ट्र शासनाचे माजी विशेष कार्यकारी अधिकारी व भारतीय जनता पार्टीच्या विधान परिषदेवरील आमदार श्रीकांत भारतीय यांनी नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानास सहकुटुंब भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. या प्रसंगी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी श्रीकांत भारतीय यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सत्कार केला. याप्रसंगी बोलताना भारतीय यांनी मी व माझे संपूर्ण कुटुंब हे श्री स्वामी समर्थांचे निस्सीम भक्त आहोत. स्वामी समर्थांच्या भक्ती चिंतनामुळे माझ्या व माझ्या कुटुंबियांना उत्तम आरोग्य व मनःशांतीचे फलित प्राप्त झाले आहे. समर्थांची कृपादृष्टी माझ्यासह नेहमीच कुटुंबियांच्या पाठीशी राहावी याकरिता आज आपण संपूर्ण येथे येऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले असल्याचे मनोगत भारतीय यांनी या प्रसंगी व्यक्त केले. यावेळी अक्कलकोटचे आमदार सचिन दादा कल्याणशेट्टी, नगरसेवक महेश हिंडोळे भारतीय जनता पार्टी पंचायत राजचे जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र वाघमोडे, युवा नेते उदय पाटील, नगरसेवक मिलन कल्याणशेट्टी, शिवशरण जोजन, मोतीराम राठोड, मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, श्रीशैल गवंडी, बालाजी पाटील, चंद्रकांत दसले, प्रसाद सोनार, महादेव तेली, संजय पवार, विपुल जाधव, गिरीश पवार, इत्यादी उपस्थित होते.