banner 728x90

सावधान! मुसळधार सरी कोसळणार, ‘सतर्क’चा अलर्ट…

banner 468x60

Share This:

आठवड्याची सुरुवातच दमदार पावसाने झालेली आहे, मुंबईत मुसळधार पावसानं पहाटेपासून हजेरी लावली आहे. पूर्व उपनगर आणि पश्चिम उपनगरांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडला आहे. मुसळधार कोसळणाऱ्या पावसाच्या धर्तीवर ‘सतर्क’ने नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे.

सध्याच्या घडीला मुंबईतील सखल भागात पाणी साचले आहे. मुंबई तसेच उपनगरे, रायगड, ठाणे, पालघर, पुणे याठिकाणी मुसळधार सरी कोसळण्याचा अंदाज वर्तवला आहे.

banner 325x300

मुंबई महानगरपालिकेच्या हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, नरिमन पॉइंट अग्निशमन केंद्रात सर्वाधिक 40 मिमी पावसाची नोंद झाली. याचबरोबरीने ग्रँट रोड येथे 36 मिमी, मेमनवाडा अग्निशमन केंद्र आणि सी वॉर्ड कार्यालय येथे 35 मिमी, कोलाबा अग्निशमन केंद्र येथे 31 मिमी, बी वॉर्ड कार्यालय येथे 30 मिमी, मांडवी अग्निशमन केंद्र येथे 24 मिमी, भायखळा अग्निशमन केंद्र येथे 21 मिमी, ब्रिटानिया स्टॉर्म वॉटर येथे 18 मिमी आणि नायर हॉस्पिटल येथे 14 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

पावसाच्या धर्तीवर हवामान खात्याने नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि आवश्यक खबरदारी घेण्याचं आवाहन केलं आहे. शहरात झालेल्या या पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचण्याची शक्यता असून, वाहतूक व्यवस्थेत काही प्रमाणात अडथळे येऊ शकतात असंही स्पष्ट करण्यात आलं आहे. पुढील 3 ते 4 तासांत शहरातील काही ठिकाणी 50 ते 60 किमी प्रतितास वेगाने वारे वाहतील. तसेच सोसाट्याच्या वाऱ्यासह विजांच्या कडकडाट होण्याची शक्यताही वर्तवली आहे. नागरिकांना प्रशासनाकडून सतर्क राहण्याचं आवाहनही करण्यात आलं आहे.

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!