पालघर-योगेश चांदेकर
पालघरः डहाणू तालुक्यातील कासा ग्रामपंचायतीच्या कारभाराचे एक एक नमुने पुढे आले आहेत. मुदत संपलेल्या सरपंचांच्या ‘डिजिटल सिग्नेचर’ने पैसे काढून ते ठेकेदार व कंपनीला देण्यात आले. त्यात माजी सरपंच रघुनाथ गायकवाड, कार्यरत सरपंच सुनीता कामडी, ग्रामपंचायत अधिकारी मोहन पाचलकर व संगणक चालक अशा तिघांवर चौकशी अहवालात ठपका ठेवण्यात आला असल्याचे समजते. याप्रकरणी संगणक चालकाची सेवा थांबवण्यात आली आहे, तर आजी माजी सरपंच आणि ग्रामपंचायत अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा प्रस्ताव जिल्हा परिषदेला पाठवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
‘लक्षवेधी’ने कासा ग्रामपंचायतीच्या अनियमित कारभाराबाबत वारंवार वृतांकन केले. त्यातील गैरप्रकार उघडकीस आणले. पंचायत समितीच्या माजी सदस्य स्वाती राऊत यांनीही काही तक्रारी केल्या होत्या. त्यानुसार पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी पल्लवी सस्ते, विस्तार अधिकारी संदीप जाधव आणि प्रवीण दांडेकर यांनी चौकशी अहवाल सादर केला. या अहवालातील काही बाबी लक्षात घेतल्या, तर कासा ग्रामपंचायतीच्या कारभारातील गैरव्यवहारावर प्रकाश पडतो.
‘डिजिटल सिग्नेचर’चा गैरवापर
कासा ग्रामपंचायतीचे संगणक चालक प्रकाश गायकवाड यांनी ग्रामपंचायत अधिकारी मोहन पाचलकर यांच्या सांगण्यावरून ठेकेदारांना ऑनलाईन प्रणालीद्वारे आगाऊ रक्कम प्रदान करण्यासाठी कार्यकाळ संपलेल्या सरपंचांच्या ‘डिजिटल सिग्नेचर’ चा वापर केला. प्रत्यक्षात न झालेल्या कामाचे खोटे फोटो ऑनलाईनवर अपलोड करण्यात आले. पूर्ण झालेल्या कामाच्या जागेवर जाऊन ‘जिओ टॅगिंग’ करणे आवश्यक असताना केंद्र चालकांनी तसे केल्याचे दिसत नाही, असा ठपका चौकशी अहवालात ठेवण्यात आल्याचे समजते.
ग्रामपंचायतीत कागदपत्रेच नाहीत
कासा ग्रामपंचायतीने ‘बालाजी सप्लायर्स’ला कामाचा कार्यारंभ आदेश दिला असला, तरी तो शासकीय नियमानुसार नाही तसेच दप्तरी कोटेशनचा तुलनात्मक तक्ता ग्रामपंचायत कार्यालयात नाही. ग्रामपंचायतला प्राप्त कोटेशनची नोंदही करण्यात आलेली नाही. कासा ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील कोणत्याही शाळेत रंगरंगोटी न करता बिले मात्र अदा करण्यात आली आहेत. शाळेच्या रंगरंगोटीची कामे करताना त्याची जाहिरात स्थानिक वृत्तपत्रात दिलेली नाही. सरपंचांची मुदत १८ जुलै २०२१ रोजी संपल्यानंतर १९ जुलै २०२१ रोजी सात कामांचा निधी सरपंचांच्या ‘डिजिटल सिग्नेचर’चा वापर करून खर्च करण्यात आल्याचे दाखवण्यात आले आहे. सात कामांची एकूण रक्कम १४ लाख ८६ हजार ९९९ रुपये संबंधित ठेकेदारास धनादेशाद्वारे ग्रामपंचायतीमार्फत अदा करण्यात आली; परंतु या कामांचे एकूण मूल्यांकन अकरा लाख सात हजार ४३१ रुपये होते. मूल्यांकनानुसार देय रकमेच्या तीन लाख १९ हजार ५२८ रुपये इतकी रक्कम जास्त देण्यात आली.
आराखड्यात नसलेल्या कामांवर बेकायदा खर्च
विशेष म्हणजे ग्रामपंचायतच्या मंजूर आराखड्यात कामे नसतानाही या निधीतून खर्च केल्याचे चौकशी अहवालातून स्पष्ट झाले आहे. मूल्यांकनापेक्षा जादा दिलेली तीन लाख १९ हजार ५२८ रुपयांची रक्कम संबंधित ठेकेदाराकडून ग्रामपंचायतीला परत मिळाली असली, तरी त्यातील गांभीर्य आणि अनियमितता पुढे आली आहे. कासा ग्रामपंचायतीचे तत्कालीन सरपंच, कार्यरत सरपंचांना महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ मधील तरतुदीनुसार व ग्रामपंचायत अधिकारी मोहन पाचलकर यांना महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा शिस्त नियम १९६४ मधील तरतुदीप्रमाणे कारवाई प्रस्तावित करण्यात आली असून त्याबाबत अहवाल जिल्हा परिषदेला पाठवण्यात आला असल्याचे समजते. केंद्र चालक प्रकाश गायकवाड यांना सेवेतून कमी करण्याबाबतची नोटीस पाठवण्यात आली आहे.
Home
पालघर
कासा ग्रामपंचायतीच्या संगणक चालकाची सेवा संपुष्टात तत्कालीन सरपंच,कार्यरत सरपंच, ग्रामपंचायत अधिकाऱ्यावर कारवाई प्रस्तावित मूल्यांकनापेक्षा जादा रक्कम दिल्याचा ठपका
कासा ग्रामपंचायतीच्या संगणक चालकाची सेवा संपुष्टात तत्कालीन सरपंच,कार्यरत सरपंच, ग्रामपंचायत अधिकाऱ्यावर कारवाई प्रस्तावित मूल्यांकनापेक्षा जादा रक्कम दिल्याचा ठपका
Recommendation for You

Post Views : 1,577 राज्यात उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे सकाळी आणि संध्याकाळी वातावरण थंड राहिल,…

Post Views : 1,577 पालघर- वसई-विरार चे प्रथम महापौर, ज्येष्ठ समाजसेवक, उद्योजक, ख्यातनाम बांधकाम व्यावसायिक…

Post Views : 1,577 पालघर-योगेश चांदेकर पालघरः पालघर जिल्ह्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीत भाजपचे जिल्हाध्यक्ष…

राज -उद्धव ठाकरे एकत्र, आज दुपारी ऐतिहासिक युतीची घोषणा, जागावाटप ठरलं, कोण किती जागांवर लढणार? वाचा
Post Views : 1,577 मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी…












