banner 728x90

सीबीआयचे देशभरात १० ठिकाणी छापे, कल्याणमधून एकाला अटक…

banner 468x60

Share This:

केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) ऑपरेशन चक्र अंतर्गत सायबर आर्थिक गुन्ह्यांविरोधात देशभर मोहीम चालवली असून त्याअंतर्गत मुंबईसह देशभरात १० ठिकाणी छापे टाकले. त्यात कल्याण येथील कारवाईत एका आरोपीला अटक करण्यात आल्याची माहिती सीबीआयकडून देण्यात आली.

सायबर आर्थिक फसवणूक रोखण्यासाठी गेल्या दोन वर्षांपासून सीबीआय ऑपरेशन चक्र अंतर्गत कारवाई करत आहे.

banner 325x300

सीबीआयने याप्रकरणी दिल्ली, हिसार, लखनऊ, मुंबई, पुणे आणि नाशिक येथील एकूण १० ठिकाणी एकाच वेळी छापे टाकले. तपासादरम्यान कल्याण येथील एका आरोपीस अटक करण्यात आली असून त्याचे नाव प्रतिक तनपुरे असल्याची माहिती सीबीआय अधिकाऱ्यांनी दिली. तो कल्याण येथील रहिवासी आहे. सायबर आर्थिक फसवणुकीत तो सहभागी असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले होते. त्याची चौकशी करणे आवश्यक असल्यामुळे त्याला याप्रकरणी अटक करण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. आरोपी सायबर फसवणूक करणाऱ्या आरोपींना बेकायदा सिमकार्ड व बनावट कागदपत्रांच्या आधारे उघडण्यात आलेले बँक खाते पुरवत होता, असा आरोप आहे. या बँक खात्यांद्वारे सायबर फसवणूकीतील रकमेपैकी काही रक्कम जमा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. छाप्यादरम्यान त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात महत्त्वाचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी सीबीआय अधिक चौकशी करत आहे.

या प्रकरणात फसवणूक करणाऱ्या टोळीने बनावट मोबाईल अॅप्लिकेशन व व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून अनेक सामान्य नागरिकांचा विश्वास संपादित केला. त्यानंतर त्यांची सायबर फसवणूक केली. त्यासाठी आरोपींनी नामांकीत कंपन्यांचे समभाग सवलतीच्या दरात देण्याचे आमीष दाखवून अनेकांना गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले. त्यांच्या आश्वासनांना भुलून अनेक गुंतवणूकदारांनी आपली मेहनतीची कमाई गुंतवल्यानंतर आरोपींनी या रकमेचा गैरवापर केला. आरोपींनी अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात सायबर फसवणूक केल्याचा संशय असून त्यामागे सराईत टोळी असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. सीबीआने एकाचवेळी केलेल्या या कारवाईत आरोपींच्या ठिकाणांहून डिजिटल स्वरूपातील तसेच कागदोपत्री पुरावे जप्त केले असून आरोपींनी फसवणूकीसाठी गुंतागुंतीचे आर्थिक व्यवहार केल्याचे सीबीआयच्या तपासात उघड झाले आहे.

ऑपरेशन चक्र ही कारवाई सायबर फसवणूक करणाऱ्या टोळ्या आणि त्यांना आधार देणाऱ्या पायाभूत सुविधांचा नष्ट करण्यासाठी सीबीआयने राबवली होती. त्या अंतर्गत एकाचवेळी देशभरात १० ठिकाणी छापे टाकण्यात आले. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याचे सीबीआयकडून सांगण्यात आले.

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!