banner 728x90

अवैध मद्य तस्करी प्रकरणी डहाणू उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई

banner 468x60

Share This:

पालघर-योगेश चांदेकर


३७ लाखांचा ऐवज जप्त
दादरा व नगर हवेलीचे मद्य पालघर जिल्ह्यात

banner 325x300

पालघरः दादरा नगर हवेली, दीव-दमण येथे कर कमी असलेले मद्य स्वस्तात विकले जाते. अन्य ठिकाणी हे मद्यविक्री करण्यास परवानगी नसते. असे असताना दादरा नगर हवेली व दीव-दमणमधील मद्य कर चुकवून पालघर जिल्ह्यात विक्रीसाठी आणले जाते. डहाणू येथील उत्पादन शुल्क विभाग व भरारी पथकाने अशाच प्रकारच्या विदेशी मद्याचे २१५ बॉक्स आणि एक वाहन असा सुमारे ३७ लाख तीस हजार चारशे रुपयांचा ऐवज जप्त केला.

डहाणू हा गुजरात, दादरा नगर हवेली व दीव-दमणच्या सीमेवर असलेला जिल्हा आहे. या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दीव दमण व दादरा नगर हवेलीवरून चोरट्या मार्गाने मद्याची तस्करी होत असते. त्यामुळे पालघर येथील राज्य उत्पादन शुल्क विभाग तसेच डहाणू येथील उत्पादन शुल्क विभागाचे भरारी पथक कायम अशा मद्य स्करीवर लक्ष ठेवून असते.

पाळत ठेवून कारवाई
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक सुनील देशमुख व त्यांच्या सहकाऱ्यांना मद्य तस्करी करणारी गाडी जव्हार परिसरातून जात असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे पाळत ठेवून डहाणू येथील उत्पादन शुल्क विभाग व पालघर येथील भरारी पथकाने चार चाकी वाहन क्रमांक (एम एच ०३/ डी एस ८५ ३५) ही आयशर कंपनीची ट्रक जात असताना तिला अडवले.

ॲमेझॉनच्या वस्तू दाखवून मद्याची तस्करी
या गाडीच्या लोखंडी दरवाजावर ॲमेझॉन नावाचे पक्के सील केले होते. ॲमेझॉनच्या मालाची डिलिव्हरी असल्याचे दाखवून त्यातून मद्याची वाहतूक केली जात असल्याचा उत्पादन शुल्क विभागाचा संशय तपासणीअंती खरा ठरला. जव्हार येथील जव्हार-नाशिक रस्त्यावर साकी हॉटेल समोर उत्पादन शुल्क विभागाच्या डहाणू व पालघरच्या पथकाने या वाहनाच्या दरवाज्याचे सील तोडून झडती घेतली असता त्यात दादरा नगर हवेली राज्यात विक्रीसाठी असलेले विदेशी मद्याचे २१५ बॉक्स आढळले. हे मद्य तसेच मद्य वाहतुकीसाठी वापरलेली आयशर कंपनीची ट्रक असा सुमारे ३७ लाख तीस हजार ४०० रुपयांचा ऐवज जप्त केला.

यांनी केली कारवाई
राज्याचे उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. राजेश देशमुख, सह आयुक्त प्रसाद सुर्वे, कोकण विभागीय उपायुक्त प्रदीप पवार, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पालघर विभागाचे अधीक्षक गणेश बारगजे, उपाधीक्षक अविनाश रणपिसे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क विभागाचे डहाणूचे निरीक्षक सुनील देशमुख, भरारी पथकाचे निरीक्षक अरुण चव्हाण तसेच दुय्यम निरीक्षक विश्वजीत आभाळे, दुय्यम निरीक्षक विकास आबनावे, अभिजीत मानकर आदींनी ही कारवाई केली या गुन्ह्याचा तपास दुय्यम निरीक्षक विश्वजीत आभाळे करीत आहेत.

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!