banner 728x90

डहाणू जनता बँक निवडणूकीत डहाणू विकास आघाडी पॅनेलचा दणदणीत विजय

banner 468x60

Share This:

पालघर-योगेश चांदेकर


विरोधकांना खाते खोलण्यात अपयश
बँकेच्या अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार याकडे लक्ष

banner 325x300

पालघरः डहाणू रोड जनता को-ऑपरेटिव्ह बँकेच्या निवडणुकीत डहाणू विकास आघाडीचे सर्वच्या सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्यांनी विजयी झाले आहेत. बँकेच्या आजी-माजी सत्ताधाऱ्यांनी एकत्र येऊन तयार केलेल्या डहाणू विकास आघाडीचा विजय हा फक्त औपचारिकता उरला होता. दोन जागा अगोदरच बिनविरोध निवडून आल्या होत्या, तर अन्य चार जागी विरोधकांना उमेदवार देता आले नव्हते. त्यामुळे विरोधी जनता प्रगती पॅनलचा पराभव निश्चित होता. त्यावर मतदानातून शिक्कामोर्तब झाला आहे.

गेल्या नऊ वर्षानंतर प्रथमच डहाणू रोड जनता को-ऑपरेटिव्ह बँकेची निवडणूक झाली. या बँकेच्या निवडणुकीसाठी आठ मतदान केंद्र होती. निवडणुकीत बँकेचे अध्यक्ष मिहीर शहा, भरत राजपूत माजी आमदार आंनद भाई ठाकूर हे एकत्र आल्याने निवडणुकीत डहाणू विकास आघाडीचा विजय होईल, याबाबत कोणाच्याही मनात शंका नव्हती.

निवडणूक लादल्याने १७ लाखांचा खर्च
निवडणूक बिनविरोध व्हावी, असा प्रयत्न होता; परंतु विरोधकांनी नऊ जागेसाठी उमेदवार उभे केल्याने बँकेवर
निवडणूक लादली गेली.निवडणूक लादली गेल्याने बँकेवर निवडणुकीसाठी सुमारे १७ लाख रुपयांचा खर्चाचा बोजा पडला आहे.

दोन महिलांची बिनविरोध निवड
या बँकेच्या १५ जागा आहेत. त्यापैकी महिलांमध्ये दोन जागा अगोदरच बिनविरोध निवडून आल्या होत्या. त्याही सत्ताधारी गटाच्या आहेत. १३ जागांसाठी २२ उमेदवार रिंगणात होते. त्यामुळे सर्वसाधारण गटातील चार जागाही सत्ताधारी गटाला मिळणार हे अगोदर स्पष्ट झाले होते. या निवडणुकीच्या काळात विरोधकांनी सत्ताधारी डहाणू विकास आघाडी पॅनलवर आरोप केले होते; परंतु सत्ताधारी गटाने मात्र बँकेच्या आणि सभासदांच्या हितासाठी आपण काय केले आणि भावी काळात काय करणार आहोत यावर भर दिला. आरोप-प्रत्यारोपाला फारसे महत्त्व दिले नाही. दरम्यान बँकेच्या निवडणुकीत सात हजार ५२७ सभासदांना मतदानाचा अधिकार होता. त्यापैकी चार हजार बावीस मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. तर मतदानाची टक्केवारी ५३.४३ होती.

विरोधी जनता प्रगती पॅनेलचे पानिपत
निवडणुकीत सत्ताधारी गटाला झालेल्या एकूण मतदानाच्या जवळजवळ दुप्पट-तिप्पट मते मिळून सत्ताधारी पक्षाचे सर्वच उमेदवार विजयी झाले आहेत. विरोधी जनता प्रगती पॅनेलचे पानिपत झाले.

सत्ताधारी गटाचे विजयी उमेदवार
भरत राजपूत २९५७, मिहीर शहा, ३१०४, भावेश देसाई २९१८, कुमार नागशेठ २९२७, वरूण पारेख ३१००, वैशाली बोथरा(बीनविरोध) उन्नती राऊत (बिनविरोध) शमी पीरा २५९४, जगदीश राजपूत २८९३,भरत शहा २९१५, रोहींटन झाईवाला २९१४, पंकज कोरे २७१३, रमेश काकड ३००६, पिनल शहा २७६६, मनोज धांगकर २८९९, हे सर्वच्या सर्व उमेदवार विजयी झाले आहेत


‘बँकेच्या हितासाठी आम्ही पक्षभेद विसरून एकत्र आलो. आर्थिक संस्थेत राजकारण नको हा त्या पाठीमागचा हेतू होता. आम्ही विरोधकांना विरोधक मानत नव्हतो. त्यांनाही प्रचारासाठी आम्ही शुभेच्छा दिल्या होत्या. सभासदांनी आमच्यावर विश्वास टाकला. त्या विश्वासाला सार्थ ठरवण्याचा आम्ही प्रयत्न करू.
भरत राजपूत, डहाणू विकास आघाडी पॅनल


‘डहाणू जनता कॉपरेटिव्ह बँकेच्या सध्या दीडशे कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. या ठेवी पाचशे कोटी रुपयांवर नेणे, जिल्ह्यात पाच-सहा नवीन शाखा उघडणे, डिजिटल आणि ऑनलाईन बँकिंग सेवा सुरू करणे तसेच सभासदांना लाभांश देणे याबाबत आम्हाला काम करायचे आहे. बँकेचा अध्यक्ष कोणाला करायचे हे सर्व १५ संचालक एकत्र बसून ठरवतील.
मिहीर शहा, डहाणू विकास आघाडी पॅनल

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!