पालघर-योगेश चांदेकर
पूरग्रस्तांची राहण्याची व्यवस्था
भाजपचे जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांचा मदतीत मोठा वाटा
पालघरः अतिवृष्टीमुळे डहाणू तालुक्यातील शेतकरी व नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी करत पूरग्रस्त व अन्य नागरिकांचे तातडीने पंचनामे करण्याची मागणी भाजपचे जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांनी केली आहे. डहाणू तालुक्यातील सरावली सावटा येथे पुराचे पाणी शिरून तेथे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यांना तातडीने मदत करण्याची मागणी राजपूत यांनी केली आहे.

भरत राजपूत व त्यांच्या सहकाऱ्यांनी सरावली सावटा येथे जाऊन पूरग्रस्त भागातील नागरिकांना धीर दिला तसेच या गावात अचानक एवढे पाणी का शिरले, याची माहिती राज्य सरकारने घ्यावी व पुढच्या वर्षी असे प्रकार होणार नाहीत, यासाठी नियोजन करावे असे त्यांनी सुचवले. डहाणूच्या तहसीलदारांशी त्यांनी या संदर्भात चर्चा करून नुकसानग्रस्त भागातील नागरिकांना तातडीने दिलासा देण्याची सूचना केली.
पुरात अडकलेल्या महिलांची सुटका आणि उपचार
विरारवरून आशागड परिसरातील देवीच्या दर्शनासाठी आलेल्या महिलांची बस पुरात अडकली. या वेळी स्थानिक नागरिकांनी तसेच जिल्हा प्रशासनाने मदत करून या बसमधील १६ महिला व चालकाला सुखरूप बाहेर काढले. त्यानंतर डहाणूतील नागरिक तसेच भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार केले. त्यांच्या खाण्यापिण्याची व राहण्याची व्यवस्था करून त्यांची विरारला रवानगी केली.

सर्वांना मदत देण्यासंदर्भात चर्चा
डहाणू तालुक्यात अतिवृष्टीमुळे तसेच अन्य नैसर्गिक संकटामुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामा करून संबंधितांना नुकसान भरपाईची रक्कम देण्याची मागणी राजपूत यंनी केली. या संदर्भात राज्य सरकारच्या मदत व पुनर्वसन विभागाशी संपर्क साधून कोणीही मदतीपासून वंचित राहणार नाही, असे राजपूत यांनी सांगितले
शहा, पिरा व पारेख यांचीही मदत
डहाणूचे माजी नगराध्यक्ष आणि डहाणू जनता कॉ.ऑपरेटिव्ह बॅंकेचे अध्यक्ष मिहीर शहा, जनता बँकेचे संचालक तथा माजी नगरसेवक शमी पिरा, संचालक वरुण पारेख आदींनीही पूरग्रस्त भागात मोठ्या प्रमाणात मदत केली. पूरग्रस्त भागातील शेकडो नागरिकांना अन्नाची पाकिटे पाठवली तसेच अन्य संसारोपयोगी साहित्याची ही मदत केली. पूरग्रस्त भागातील नागरिकांवर उपचाराची आणि स्थलांतरित नागरिकांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली.

‘पूरग्रस्त भागात स्वच्छतेची तसेच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था डहाणू नगरपालिकेमार्फत करण्यात येत आहे. संबंधितांना तशा सूचना दिल्या आहेत. पर्यायी व्यवस्था होईपर्यंत ही व्यवस्था सुरू राहील.
भरत राजपूत, जिल्हाध्यक्ष, भाजप

















