पालघर-योगेश चांदेकर
पालघर-सामाजीक जीवनात समाजातील मुख्य प्रवाहात नसलेल्या घटकांसाठी त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचं काम अनेक समाजसेवक करताना दिसून येतात. वनवासी बांधव, अनाथ मुलं, निराधार नागरिक, किन्नर, सेवावस्तीतील नागरिक अशा अनेक नागरिकांसाठी समाजसेवेची उदाहरणं आपण पाहत असतो. सामाजिकदृष्ट्या ही सेवा नक्कीच महत्त्वाची आहे; मात्र एखाद्या कुटुंबातील व्यक्ती गेल्यानंतर मदतीला धावून जाणं जास्त महत्त्वाचं असतं. संदीप प्रकाश पाटील हे त्यापैकी एक. त्यांचा आज वाढदिवस. त्यांना शुभेच्छा
दीनदुबळे, गरीब अनेक असतात. त्यांना पदोपदी संकटाचा सामना करावा लागतो. अशावेळी सरकार कुठलही असलं, तरी ते मदतीला पुरं पडू शकत नाही. दीनदुबळ्या गरिबांना अडचणीच्या काळात मदतीला धावून जाणारं नाव म्हणजे सन साई ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संदीप प्रकाश पाटील. गेल्या पंधरा-वीस वर्षांपासून हे नाव पालघर जिल्ह्यात सर्वदूर पोहोचलं आहे. समाजाची सेवा करताना, दीनदुबळ्यांना मदतीचा हात देताना त्याची वाच्यता करायची नाही. काम मात्र सातत्यानं सुरू ठेवायचं अशी त्यांची वृत्ती. कोणत्याही पदाची किंवा समाजानं उपकृत करावं, अशी अपेक्षा नाही. हात आपला मोकळा सोडायचा हे व्रत त्यांनी अनेक वर्षे जोपासलं आहे. पालघर जिल्हा आदिवासी, दुर्गम आहे या भागात आरोग्याच्या पुरेशा सुविधा नाहीत. गावापर्यंत पोहोचण्यासाठी रस्ते नाहीत. सुमारे बाराशे वाड्या, वस्त्या, पाडे अंधारलेले आहेत. हे फार मोठं आव्हान आहे. ते पूर्ण करणं सरकारला सहजशक्य नाही; परंतु संदीप प्रकाश पाटील हे मात्र आपल्या परीनं जशी आणि जेवढी होईल, तेवढी मदत करत असतात. त्यांच्या घरातून मदतीच्या अपेक्षेनं आलेल्या कोणीही विन्मुख होऊन परत जाणार नाही, याची मात्र सर्वांना खात्री असते. आदिवासी वाड्या-पाड्यात जंगली जनावरांचं प्रमाण मोठं असतं. संध्याकाळ नंतर घरातून बाहेर पडणंही अशक्य होतं. मुला, महिलांना तर घराबाहेर पडणं आणखी मुश्किल. अनेकांनी संध्याकाळ नंतरची बाहेरची रात्र कशी हे कधी पाहिलंच नाही. गावाकडं काही वस्त्या दुर्गम असतात. अशा पार्श्वभूमीवर या लोकांच्या कथा, व्यथा, वेदना पाटील यांनी समजावून घेतल्या. त्यांची दुःख जाणून घेतली. समाजातील उपेक्षित वर्ग सातत्यानं मदतीसाठी कुणा तरी मसिहाच्या प्रतीक्षेत असतो. अशा लोकांच्या चेहऱ्यावर समाधान आणण्याचं काम संदीप पाटील वारंवार करत असतात. गोरगरिबांना मुख्य मदत लागते, ती आरोग्याच्या समस्येच्या वेळी. ऐनवेळी मोठा आजार उद्भवतो. सर्वांची अशा कठीण परिस्थितीत उपयोगी येईल, अशी बचत असतेचं असं नाही. सर्वच रुग्णांना सरकारी रुग्णालयातील अनुभव चांगला असतोच असं नाही. अशा वेळी संदीप पाटील पुढं येतात. एखाद्या गर्भवती महिलेला किंवा गंभीर आजारी असलेल्या व्यक्तीला मोठ्या रुग्णालयांपर्यंत पोहोचवण्यासाठी आर्थिक मदत करणं असो की अडल्या-नडलेल्यांची दवाखान्याची थकलेली बील देण्याची वेळ; ते सातत्याने आपला हात ढिला सोडतात.
अनेकांना गावातून चिखलामुळं बाहेर पडणं अवघड होतं. अशा वेळेलाही त्यांचीच मदत तिथं पोहोचलेली असते. अनेक गावं अंधारलेली आहेत. वाड्या-पाड्यावर प्रकाश नाही. काही गावात व्यक्तिगत कुटुंबात वीज असली, तरी रस्ते मात्र अंधारलेले असतात. अशा ठिकाणी स्वखर्चानं पथदिवे बसवून देण्याचं काम संदीप पाटील सन साई ग्रुप करत असतात. प्रकाशमान झालेली गावं आणि लोकांच्या चेहऱ्यावरचा प्रकाश हाच संदीप पाटील यांच्या समाधानाचा विषय असतो. पालघर जिल्ह्यात पावसाचं प्रमाण प्रचंड आहे. अशा वेळी सर्वांकडंच पावसापासून संरक्षणासाठी रेनकोट असतात असं नाही. काही तर झाडाझुडपाचा पाला डोक्यावर घेऊन पावसातून वाट काढत असतात. अशा लोकांवर छत्र धरण्याचं काम संदीप पाटील करत असतात. समाजात वावरत असताना कोणकोणत्या घटकांना जास्त त्रासाला आणि संकटाला सामोरं जावं लागतं, हे पाहून त्या दृष्टीनं ते नियोजन करत असतात. बऱ्याचदा पोलिसही ऊन, वारा, पाऊस याची तमा न बजावता कर्तव्य बजावत असतात. पोलिसांनाही छत्र्या उपलब्ध करून देण्याचं काम ते करतात. पालघर जिल्ह्यातील अनेक गावं, वाड्या, वस्त्या पाडे तहानलेले आहेत. काही गावात पाणीपुरवठा होत असला, तरी तो पुरेसा नसतो. दूषित आणि गढूळ पाणी येत असते. त्यामुळं नागरिकांचं आरोग्य धोक्यात येत असतं. अशा परिस्थितीवर अनेक ठिकाणी गावांना शुद्ध पाणीपुरवठा करण्याचं काम संदीप पाटील यांनी केलं आहे काही गावांना वीजपंप तर काही गावांना शुद्धीकरण प्रकल्प त्यांनी दिले आहेत. अनेक गावात कार्यक्रमासाठी सभागृहं नसतात. व्यासपीठ नसतं अशा ठिकाणी स्वखर्चातून व्यासपीठ बांधण्याचं काम त्यांनी केलं आहे. पालघर जिल्ह्यातील अनेक शाळा, महाविद्यालयांच्या स्पर्धांना संदीप पाटील हेच पुरस्कार प्रायोजित करत असतात. अनेक खेळाडूंना वेगवेगळ्या पातळीवर खेळता यावं, यासाठी त्यांचा मदतीचा हात कायम विद्यार्थ्यांच्या आणि खेळाडूंच्या पाठीशी असतो. सण उत्सव आयोजित करून ते आपली कला आणि संस्कृती जोपासण्याचं काम करत असतात. नंडोरेसह अनेक गावातील महिला, युवती संदीप पाटील यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात. संदीप पाटील यांनी कोणत्याही फळाची अपेक्षा व्यक्त न करता केलेल्या कामाची पावती त्यांच्या कृतज्ञतेतूनच मिळते. संदीप पाटील यांचं काम केवळ पालघर शहर आणि तालुक्यापुरताच मर्यादित नाही, तर ते नालासोपाऱ्यापर्यंतही पोहोचला आहे. अनेक कार्यक्रमासाठी ते शाळांना मदत करत असतात. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत असतात.
संदीप पाटील यांचं एक काम अतिशय महत्त्वपूर्ण आहे आणि त्याची कुणाशीही तुलना करता येणार नाही आनंदाच्या क्षणात तर कोणीही सहभागी होतं; परंतु दुःखात सहभागी होणाऱ्या व्यक्तींचं प्रमाण फारच कमी असतं. संदीप पाटील मात्र त्याला अपवाद आहेत. कुणाच्याही घरातलं एखादं माणूस वारलं, की ते कोणत्याही समाजाचा असो; संदीप पाटील यांचा मदतीचा हात तयारच असतो. लाकडापासून अंत्यसंस्कारापर्यंत लागणारं सर्व साहित्य ते मोफत पुरवत पुरवतात. त्यांच्या कानावर एखाद्याच्या मृत्यूची बातमी गेली, की त्या कुटुंबाला आर्थीक मदत ते देतात. अंत्यसंस्काराला जशी मदत ते करतात, तसंच दशक्रिया विधीसाठी ही प्रसंगी एखाद्याची ऐपत नसेल तर त्याला ते मदत करत असतात आणि अंगणवाड्यांना त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे मदत केली आहे. रिक्षा चालकापासून पोलिसांपर्यंत समाजातील विविध घटक त्यांनी जोडलेले आहेत. कोरोनाच्या काळात देशात लस मिळवण्यासाठी आणि एखाद्याला कोरोना झाल्यानंतर लागणाऱ्या अन्य लसीसाठी किती धावपळ करावी लागत होती हे जगानं अनुभवलं आहे, पाहिलं आहे. पालघर जिल्ह्यातही हा अनुभव आला आहे. ऐन पावसाळ्यात रात्रीपासून दुसऱ्या दिवसापर्यंत रांगेत उभं राहूनही अनेकांना लस मिळत नव्हती. दोन-दोन, तीन दिवस प्रतीक्षा करूनही लस उपलब्ध होत नव्हती. वेगवेगळ्या प्रकारच्या समजुती, गैरसमजुती आणि भीतीचं वातावरण असताना लस मिळवण्यासाठीची धडपड सुरू होती. संदीप पाटील यांनी ते पाहिलं आणि लोकांचं दुःख हलकं करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. सन साई आणि सोहम फूड कंपनीनं वेगवेगळ्या कंपन्यांकडून स्वतः कोरोना लसी खरेदी करून त्या वेगवेगळ्या रुग्णालयांना उपलब्ध करून दिल्या. त्यामुळं ‘टीनएजर्स’पासून वयोवृद्धापर्यंत अनेकांना लस मिळवण्यासाठी दारोदार भटकण्याची गरज राहिली नाही. कोरोनाची लस मिळाल्यानं अनेकांना त्या वेळी जीवदान मिळालं. खूप मोठा बदल मी कदाचित घडवू शकणार नाही; पण कोणाच्या तरी आयुष्यात एक सेकंद जरी मी आनंद निर्माण करू शकलो, तर ती समाजसेवाच आहे. वयानं आपण कितीही मोठं झालो, तरी समाजशास्त्रातील छोटे छोटे धडे आजही लागू पडतात हे कळायला माझ्या आयुष्याची इतकी वर्षे गेली. ही छोटी छोटी कामं मनाला अधिक समाधान देतील असं वाटतं, असं सांगताना ते संदीप पाटील यांच्या डोक्यात कुठलीही हवा गेलेली नाही, हे जाणवतं. त्यांचं हे कार्य असंच अव्याहत चालू राहणार आहे. त्यांच्या या कार्याला आणि त्यांच्या वाढदिवसाला हार्दिक शुभेच्छा!