Devendra Fadnavis : महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या (Mahanagar palika Election Akola) पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. दिग्गज नेते महापालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारात उतरले आहेत, आज अकोल्यात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis ) यांची जाहीर सभा झाली.
आज पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी लाडक्या बहिणींना साद घातलीय. आपण मुख्यमंत्री असेपर्यंत कुणीही ‘लाडकी बहीण योजना’ (Ladki Bahin Yojana) बंद करु शकणार नसल्याचा पुनूरुच्चार त्यांनी केला आहे.
अकोल्यात भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या युतीची फडणवीसंच्या उपस्थितीत प्रचार सभा
आज देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis ) अकोल्यात भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या युतीच्या प्रचार सभेला आले होते. अकोल्यातील क्रिकेट क्लब मैदानावर त्यांची सभा झाली. यावेळी मंचावर पालकमंत्री आकाश फुंडकर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी, भाजपचे आमदार रणधीर सावरकर, प्रकाश भारसाकळे, हरिष पिंपळे वसंत खंडेलवाल यांच्यासह दोन्ही पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित होतेय. दरम्यान, अकोल्यात मोठी घोषणा करतांना देवेंद्र फडणवीसांनी राज्यातील लहान महापालिकांना आनंदाची बातमी दिली आहे. यापुढे राज्य सरकारच्या विकास योजनांमधील लहान महापालिकांचा 30 टक्के वाटा राज्य सरकार भरणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे. त्यामुळं अनेक विकास योजनांमध्ये आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे विकास वाटाणा भरु न पाहणाऱ्या महापालिकांचा यामध्ये फायदा होणार आहे.
जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होणार नाही
छोट्या महापालिकांना द्यावा लागणारा विकास योजनांतील 30 टक्के हिस्सा यापुढे राज्य सरकार देईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले आहे. महायुतीला 232 जागा मिळाल्यानंतर लाडकी बहीण योजना बंद करतील असं विरोधक म्हणायचे. मात्र, जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होणार नाही असे फडणवीस म्हणाले. दरम्यान, सध्या महानगर पालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली आहे. सर्वच राजकीय फक्षातील नेत्यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. कुठं युत्या आहेत तर कुठं आघाड्या झाल्या आहेत. काही ठिकाणी बंडखोरी देखील झाल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, या निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय नेते ऐकमेकांवर आरोप प्रत्यारोप देखील करताना पाहायला मिळत आहे.
















