banner 728x90

डॉ.अक्षय गडग याच्या विरुद्ध पत्नीचा छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

banner 468x60

Share This:

पालघर-योगेश चांदेकर

तत्कालीन वैद्यकीय अधिकारी व माजी सरपंचासह ८ जणांवर वसई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

banner 325x300

प्रेम प्रकरण असताना लग्न करून फसवणूक, छळ व हुंड्याची मागणी केल्याची तक्रार

पालघरः डहाणू तालुक्यातील आशागड, तसेच गंजाड प्राथमिक आरोग्य केंद्राचे तत्कालीन वैद्यकीय अधिकारी अक्षय गडग यांची प्रवृत्तीच गुन्हेगारी स्वरूपाची असून एकीकडे आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप त्यांच्यावर असताना दुसरीकडे त्यांच्या पत्नीची फसवणूक केल्याचा तसेच तिचा शारीरिक व मानसिक छळ केल्याचा गुन्हा वसई पोलीस ठाण्यात अक्षय गडग यांच्यासह कुटुंबातील आठ जणांवर दाखल करण्यात आला आहे.

डॉ. अक्षय गडग यांचे १७ डिसेंबर २०२३ ला लग्न झाले. लग्न झाल्यानंतर त्यांनी पत्नीला कधीही पत्नीसारखी वागणूक दिली नाही; उलट आई-वडील आणि बहिणीच्या सांगण्यावरून ते पत्नीला सातत्याने दूरच ठेवत होते. सासरी नांदत असताना तिचा शारीरिक आणि मानसिक छळ करण्यात आला. सासरे मद्यपन करून शिवीगाळ करायचे तर सासू व अन्य लोकही त्रास द्यायचे. क्षुल्लक कारणावरून तिला शिवीगाळ केली जायची. मारहाण केली जायची.

पैसे आणण्यासाठी तगादा
लग्न जमवताना याच गडग कुटुंबीयांनी हुंडा घेणार नसल्याचे सांगितले होते; परंतु लग्नानंतर मात्र पत्नीचा हुंड्यासाठी छळ केला जायचा. त्यावर टोचून बोलले जायचे. माहेरून पैसे आणण्यासाठी दबाव टाकला जायचा. विशेष म्हणजे डॉ. गडग यांची पत्नी एका पोलिसाची मुलगी असूनही तिचा अशा प्रकारे छळ करण्यात येत होता. मानसिक आणि शारीरिक छळामुळे ती कायम आजारी पडायची. तिचा छळ करण्यासाठी तिच्यावर जादा कामे टाकली जायची. मोलकरणीलाही कामावरून काढून टाकून ही सर्व कामे तिला करायला भाग पाडायचे.

माहेरशी संपर्क ठेवला, तर हाकलण्याची धमकी
जास्त पाणी वाया घालवते, वीज, पंखे चालू ठेवते, लॅपटॉपवर मालिका बघते, घराची साफसफाई करत नाही, जेवण नीट बनवत नाही अशा स्वरूपाच्या तक्रारी करत छळ करायचे. माहेरच्या व्यक्तींना घरी बोलावले तर हाकलून देईल अशी धमकीही द्यायचे. लग्नाच्या दिवसापासूनच माहेरच्या तसेच जवळच्या कुटुंबीयांशी संपर्क तोडण्यास सांगण्यात आले.

सासऱ्यांवर आरोप
डॉ. गडग यांच्या पत्नीने सासरेही लज्जा उत्पन्न होईल असे वागत असल्याच तक्रारीत म्हंटले आहे. पतीचे मामा आनंद देसक, अभिजीत देसक, मामी जयश्री देसक हे सुद्धा वारंवार घरी येऊन धमकी द्यायचे. छळ करायचे. याप्रकरणी डॉ. गडग यांच्या पत्नीच्या वडिलांनी पोलिस ठाण्यात तक्रार देण्याचा प्रयत्न केला, तेव्हा मध्यस्थांकरवी हे प्रकरण मिटवण्यात आले. कोणीही कोणावर आरोप न करता पुन्हा नव्याने सुरुवात करा असे सांगण्यात आले. ९ जून २०२४ रोजी या प्रकरणात तोडगा निघाल्यानंतर अवघ्या पाचच दिवसात पुन्हा छळ सुरू झाला.

दरम्यान आता याप्रकरणी वसई पोलीस ठाण्यात सासरे सुरेश सोमा गडग, सासू आशा सुरेश गडग,नणंद अंकिता सुरेश गडग, मामा अभिजित देसक, अमित देसक, आनंद देसक, मामी जयश्री देसक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे

‘लीव्ह इन’ मध्ये राहत असताना फसवणूक
गडग यांचे एक प्रेम प्रकरणही बाहेर आले. एका महिलेसोबतचा त्यांचा फ्रेम केलेला फोटो पत्नीला दिसला. त्याबाबत विचारणा केली असता डॉ. गडग यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. याबाबत सासू-सासऱ्यांना विचारणा केली असता सासऱ्याने मद्याच्या नशेत मारहाण केली. घरातून हाकलून लावले. या घटनेनंतर आणखी चौकशी केली असता डॉ. गडग यांचे रुग्णालयात काम करणाऱ्या एका परिचारिकेशी डॉ. गडग यांचे प्रेमसंबंध असल्याचे समजले. डॉ. गडगं यांनी तिला लग्न करण्याचे वचन दिले होते; परंतु त्यांनी लग्न केल्याचे समजल्यानंतर नंतर तिने त्यांना मारहाण केली होती. तिने गडग यांच्या कुटुंबीयांना फोन करून मी घरी राहायला येण्याची धमकीही दिली होती. डॉ. गडग हे तिच्यासोबत ‘लीव्ह इन रिलेशन’मध्ये राहत असून त्यांचे हे लफडे बाहेर येऊ नये, म्हणूनच तर त्यांनी माझ्यावर नजर ठेवून कोणाशी मिळू मिसळू दिले नव्हते, असा आरोप या पत्नीने केला असून तशी फिर्याद वसई पोलीस ठाण्यात दिली आहे.

देसक यांच्या अपात्रतेवर हायकोर्टाचे शिक्कामोर्तब
दरम्यान, या प्रकरणातील अभिजित देसक यांच्यावर अतिक्रमणचा ठपका ठेवून त्यांचे सरपंच पद रद्द झाले आहे अभिजीत देसक यांना जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र असल्याचा निर्णय दिला होता. त्या विरोधात त्यांनी केलेले अपील विभागीय आयुक्तांनीही फेटाळले. नंतर उच्च न्यायालयाने त्यांना ग्रामपंचायत सरपंच म्हणून अपात्र ठरवले होते.

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!