banner 728x90

डॉ. समता कल्पेश पाटील यांना पीएच.डी. पदवी प्रदान कायदेविषयक संशोधन क्षेत्रात मानाचा टप्पा

banner 468x60

Share This:

बोईसर- मिलिंद चुरी

पालघर सोनोपंत दांडेकर शिक्षण मंडळी विधी महाविद्यालयाच्या ग्रंथपाल डॉ. समता कल्पेश पाटील यांनी “Citation Analysis of Indian Bar Review: Mapping the Landscape of Legal Research and Influence” या विषयावर प्रबंध सादर करून पीएच.डी. पदवी संपादन केली आहे.

banner 325x300

त्यांच्या या संशोधनातून भारतीय बार रिव्ह्यू या प्रख्यात कायदेविषयक नियतकालिकाच्या माध्यमातून कायदेशीर संशोधनातील प्रवाह व प्रभावाचा सखोल अभ्यास मांडण्यात आला आहे.

डॉ. पाटील यांनी बी.ए., C.Lib., B.Lib. & I.Sc., M.Lib. & I.Sc. या पदव्या प्राप्त केल्या असून त्यांना ग्रंथालय व माहितीशास्त्र क्षेत्रातील १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी शैक्षणिक, तांत्रिक व प्रशासकीय जबाबदाऱ्या प्रभावीपणे पार पाडल्या आहेत. विशेषत: कायदेविषयक विद्यार्थ्यांना मूट कोर्ट तयारीत त्यांनी सातत्याने मार्गदर्शन केले असून ऑनलाईन डेटाबेस व व्हर्च्युअल रेफरन्स सेवांच्या माध्यमातून संशोधनास दिशा दिली आहे.

त्यांनी राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये संशोधन निबंध सादर केले आहेत. दोन पुस्तक अध्यायांचे लेखन व प्रकाशन करून त्यांनी आपल्या शैक्षणिक दृष्टीकोनाची प्रचिती दिली आहे. कठोर परिश्रम, चिकाटी आणि अभ्यासू वृत्ती यांच्या बळावर त्यांनी ग्रंथालय व माहितीशास्त्र क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केली आहे.

या यशस्वी प्रवासात त्यांना मार्गदर्शक म्हणून सोनपंत दांडेकर महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. पायल चोरेला यांचे कायदेशीर मार्गदर्शन लाभले, तसेच त्यांच्या कुटुंबीयांचा मोलाचा सहभाग राहिला. डॉ. समता पाटील यांचे हे संशोधन भविष्यातील संशोधक व विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक ठरणार असल्याचे शैक्षणिक वर्तुळातून व्यक्त करण्यात आले आहे.

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!