banner 728x90

अतिवृष्टीग्रस्त शेतकरी बांधवांसाठी २ कोटींची मदत; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निधी सुपूर्त

banner 468x60

Share This:

महाराष्ट्र राज्य केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनची अतिवृष्टीग्रस्त शेतकरी बांधवांसाठी मदत

महाराष्ट्र राज्यातील अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकरी बांधवांना दिलासा देण्यासाठी महाराष्ट्र राज्य केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी तब्बल २ कोटी रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांना सुपूर्त करण्यात आला. या उपक्रमातून राज्यातील आपत्तीग्रस्त शेतकरी कुटुंबांना आर्थिक मदत मिळणार असून, समाजाप्रती असलेली औषध व्यवसायिकांची बांधिलकी पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

यावेळी राज्याच्या उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्राताई अजितदादा पवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री मा. श्री. चंद्रकांत दादा पाटील, कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. श्री. हेमंत रासने, अखिल भारतीय औषध संघटनेचे अध्यक्ष मा. श्री. जगन्नाथ उर्फ आप्पासाहेब शिंदे, खजिनदार श्री. वैजनाथ जागुष्टे, श्री. हुकुमराज मेहता, श्री. सुनीलजी छाजेड यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रभावी समन्वय केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्टचे सचिव श्री. अनिल बेलकर यांनी केले.

महाराष्ट्र राज्य केमिस्टस् अॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशन ही राज्यातील १,२५,००० औषध विक्रेत्यांचे प्रतिनिधित्व करणारी संस्था आहे. संघटनेने आपल्या सभासदांकरिता कार्य करित असतांना नेहमीच सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवलेली आहे. देशावर अथवा राज्यावर ज्या ज्या वेळी नैसर्गिक आपत्ती ओढवली असेल अथवा कोरोना सारख्या विषाणुचा प्रादुर्भाव असेल अशा प्रत्येक वेळी संघटनेने मदतीचा हात पुढे केला आहे.

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!