आपल्या अदा आणि डान्सने वेड लावणारी गौतमी पाटील नेहमीच लाइमलाइटमध्ये असते. तिची क्रेझ खूप असून लहानांपासून मोठ्यांपर्यंत तिचे चाहते आहेत. महिलांमंडळीही तिच्यासाठी वेड्या आहेत.
अनेकांच्या ओठांवर तिचंच नाव असतं. तिचा साधेपणा, खतरनाक डान्स, हटके अदा लोकांना तिच्या प्रेमात पाडतात. गौतमी बिग बॉसच्या घरात वाईल्ड कार्ड एन्ट्री करणार अशा अनेक दिवसांपासून चर्चा होत्या. मात्र अखेर यामागचं सत्य समोर आलंय.
ऑर्केस्ट्रा डान्सर गौतमी पाटीलला कलर्स मराठीवरच्या बिग बॉसच्या घरात वॉईल्ड कार्डद्वारे थेट एन्ट्रीची खुली ऑफर देण्यात आली होती. पण तिनं ही ऑफर नाकारली आहे. त्यामुळे जे चाहते तिला बिग बॉसमध्ये पाहण्यासाठी उत्सुक होते त्यांची निराशा झाली आहे.
बिग बॉस नाकारण्याचं कारणंही गौतमीनं सांगितलं. राज्यभरातील नियोजित शोजच्या तारखा आधीच फिक्स झाल्या आहेत. त्यामुळे बिग बॉसच्या घरात जाण्यास नकार दिल्याचं गौतमी पाटीलने न्यूज18 लोकमतशी बोलताना सांगितलं. त्यामुळे आता चर्चांवर पूर्णविराम लागला असून गौतमी बिग बॉस करणार नसल्याचं कन्फर्म झालंय.
नुकत्यात झालेल्या दहीहंडी उत्सवातही गौतमी पाटीलने मुंबई, ठाण्यातल्या दहीहंडी मंडळांसमोर धमाकेदार डान्स करून गोविंदांचे लक्ष वेधून घेतलं होतं. पुण्यातील वाघोलीत तर गौतमीचा शो लावता यावा, यासाठी चक्क गोकुळ अष्टमीच्या दुसऱ्या दिवशी दहीहंडी फोडली होती. आताच्या गणेशोत्सवातही गौतमीच्या तारखा बूक असल्यानेच तिने बिग बॉसच्या घरात जायला नकार दिल्याचं सांगितलं.