पालघर-योगेश चांदेकर
पालघर- तालुका विधी सेवा समिती,पालघर आयोजित शासकीय योजनांचा जनजागृती शिबिर व विधी सेवा प्राधिकरण योजना तसेच कायदेविषयक जनजागृती शिबीर ग्रामपंचायत माहीम येथे पार पडले.
सर्व केंद्र व राज्यशासनाच्या,विधी सेवा प्राधिकरणाच्या योजनांची माहिती एका छत्राखाली मिळावी व कायदेविषयक जनजागृती व्हावी यासाठी महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण,मुंबई व अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण,ठाणे तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश ठाणे यांच्या निर्देशानुसार या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीम.ए. व्ही.चौधरी इनामदार जिल्हा न्यायाधीश -१ यांनी केले.आपल्या देशाच्या प्रगतीसाठी सरकारने राबवलेल्या विविध योजनांचा उपक्रमांचा लाभ प्रत्येक नागरिकाला मिळावा यासाठी जनजागृती व्हावी हा या शिबिराचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. घरकुल योजना,पशू विभाग,महसूल, वन विभाग,आरोग्य,आदिवासी विकास प्रकल्प,कृषी विभाग,पंचायत समिती,बालविकास प्रकल्प,संरक्षण विभाग अशा विविध विभागातील अधिकाऱ्यांमार्फत योजनांची पुरेपूर माहिती ग्रामस्थांना देण्यात आली.

महिला व बालविकास विभागामार्फत संरक्षण अधिकारी संभाजी पवार,बालविकास विभागातर्फे सुरेखा सुरवते,आरोग्य विभागातर्फे डॉ.वैशाली शेगोकार, पशुधन विभाग डॉ.राहुल संखे,प.समिती आर.एल.पाटील,तहसील कार्यालय सुनील गावित,जिल्हा व बाल संरक्षण विभाग विनोद राठोड यांनी संबंधित विभागाच्या योजनांची माहिती नागरिकांना दिली.या कार्यक्रमात सर्व विभागातर्फे स्टॉल लावण्यात आले व विभागातर्फे राबवण्यात येणाऱ्या योजनांसंबधी माहिती पुस्तिका नागरिकांना वितरित करण्यात आली.
या कार्यक्रमासाठी ए.पी.कोकरे दिवाणी न्यायाधीश व. स्तर पालघर,एम.के.सोरते सहदिवाणी न्यायाधीश क. स्तर,वकील संघटनेचे अध्यक्ष दिपक भाते ,सचिव अँड.चिन्मय राऊत, अँड.संयुक्ता तामोरे, सर्व वकील,माहीम ग्रामस्थ,अंगणवाडी सेविका,मदतनीस,बचतगट महिला,सर्व शासकीय व न्यायालयीन कर्मचारी उपस्थित होते.हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी ग्रामपंचायत माहीम,वकील बार संघटना तसेच न्यायालयीन कर्मचारी यांनी खूपच मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उमेश भागवत लिपिक अप्पर जिल्हा न्यायालय पालघर व समारोपीय भाषण वकील दीपक भाते तसेच आभार प्रदर्शन प्रमोद कंक शिपाई अप्पर जिल्हा न्यायालय यांनी केले.