banner 728x90

खुशखबर! आता 100 टक्के टोलमाफी, राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय

banner 468x60

Share This:

केंद्र सरकार तसेच राज्य सरकार गेल्या अनेक वर्षांपासून इलेक्ट्रिक व्हेईकल वापरण्याला प्रोत्साहन देत आहे. याच निर्णयांचा एक भाग म्हणून महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

या निर्णयाचा राज्यातील अनेक इलेक्ट्रिक वाहनधारकांना फायदा होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार सरकारने राज्यातील 3महामार्गांवर सरकारने इलेक्ट्रिक वाहनांसाठी टोलमाफी दिली आहे.

कोणत्या वाहनांना टोलमाफी मिळणार?

राज्य सरकारचा हा निर्णय आता लागू झाला असून तीन महामार्गांवर इलेक्ट्रिक वाहनांना टोल म्हणून एकही रुपया द्यावा लागणार नाही. अनेक इलेक्ट्रिक वाहनधारकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. राज्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी बाबत माहिती दिली आहे. मोटार व्हेइकलअॅक्ट1958अंतर्गत सरकारने हा निर्णय घेतला आहे. या निर्णयाअंतर्गतM2, M3 आणि M6 श्रेणीच्या चारचाकी इलेक्ट्रिक वाहनांना तसेच राज्य परिवहन महामंडळ (STU) आणि खासगी कंपन्यांच्या इलेक्ट्रिक बसेसना ही टोलमाफी लागू असेल. सरकारची ही टोलमाफी22ऑगस्ट 2025रोजीपासून लागू झालेली आहे.

सरकारचे मत काय?

सरकारच्या या निर्णयामुळे इलेक्ट्रिक वाहन असणाऱ्यांना प्रवास स्वस्त होणार आहे. या निर्णयामुळे इलेक्ट्रिक वाहन खरेदीला चालना मिळेल, असे सरकारचे मत आहे. यामुळे इलेक्ट्रिक वाहन निर्मिती उद्योगांनाही यामुळे चालना मिळणार आहे. या निर्णयामुळेपर्यावरणपुरक वाहनांतही वाढ होण्याची शक्यता सरकारने व्यक्त केली आहे. सरकारच्या या निर्णयाचे सर्वच स्तरातून स्वागत केले जात आहे. या एका निर्णयामुळे आता इलेक्ट्रिक वाहनधारकांचेहजारोरुपये वाचणार आहेत.

इलेक्ट्रिक वाहन असल्याने काय फायदा होतो?

इलेक्ट्रिक वाहन वापरण्याचे अनेक फायदे आहेत. सर्वात महत्त्वाचे या वाहनांमुळे प्रदूषण कमी होते. तसेच इंधनाचा खर्चही कमी होतो. सर्वसामान्य वाहणांना चालवण्यासाठी पेट्रोल, डिझेलची गरज असते. तर दुसरीकडे इलेक्ट्रिक वाहनांना मात्र पेट्रोल, डिझेलची गरज नसते. ही वाहनं पर्यावरण पुरक असल्याचे म्हटले जाते. इलेक्ट्रिक वाहनांमुळे ध्वनीप्रदूषण, वायूप्रदूषण होत नाही. त्यामुळेच जास्तीत जास्त इलेक्ट्रिक वाहने वापरावीत असे आवाहन केले जाते.

banner 325x300

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!