आरोग्य विमा खरेदी करणार असाल किंवा आधीच घेतला असेल तर तुमच्यासाठी दिलासादायक बातमी आहे. आरोग्य विम्याचा दावा करण्यासाठी आता 24 तास रुग्णालायत दाखल राहण्याची अट यापुढे राहणार नाही.
अनेक विमा कंपन्या फक्त दोन तासांसाठी रुग्णालयात दाखल झाले असाल तर विम्याचा दावा मंजूर करत आहेत. होय, आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञान आणि जलद उपचार प्रक्रिया लक्षात घेऊन हा बदल करण्यात आला आहे.
आजच्या काळात वैद्यकीय तंत्रज्ञान खूप प्रगत झाले आहे त्यामुळे आरोग्य विम्याच्या दावा प्रक्रियेत हा बदल करण्यात आला आहे. यामुळे आता अनेक उपचार खूप लवकर केले जातात. याआधी मोतीबिंदू शस्त्रक्रिया, केमोथेरपी किंवा अँजिओग्राफीसाठी रुग्णालयात रात्रभर राहणे आवश्यक होते, पण आता सर्व काही तासांत होत आहे.
आरोग्य विम्यासाठी 24 तास रुग्णालयात भर्तीची अट नाही
आधी आरोग्य विम्याचा दावा मिळविण्यासाठी 24 तास रुग्णालयात दाखल असणे आवश्यक होते पण, आता तसे नाही. विमा कंपन्या आता 24 तास रुग्णालयात दाखल होण्याची अट उपचारांसाठी आवश्यक मानत नसून आता रुग्णालयात दाखल झाल्यानंतर 2 तासांनीही दावा मिळू शकतो.
ही सुविधा कोणत्या योजनेत उपलब्ध?
काही आरोग्य विमा योजनांमध्ये 2 तासांच्या हॉस्पिटलायझेशनचा समावेश आहे. यामध्ये ICICI लोम्बार्ड एलिव्हेट प्लॅन, केअर – सुप्रीम प्लॅन आणि निवा बुपा – हेल्थ इन्शुरन्स प्लॅन यांचा समावेश आहे. ICICI लोम्बार्ड एलिव्हेट प्लॅन 10 लाख रुपयांचे कव्हर देते, ज्यासाठी सुमारे 9,195 रुपये प्रतिवर्ष प्रीमियम भरावा लागतो. 30 वर्षाच्या व्यक्तीसाठी ही पॉलिसी असून केअर – सुप्रीम प्लॅन सुमारे 12,790 रुपये वार्षिक प्रीमियमवर 10 लाख रुपयांचे कव्हर देते. तसेच निवा बुपा – आरोग्य विमा प्लॅन 10 लाख रुपयांचे कव्हर देते, ज्याचा वार्षिक प्रीमियम सुमारे 14,199 रुपये आहे.
आरोग्य विमा दाव्यात वेळेत बदल का आवश्यक
– आजच्या काळात अनेक वैद्यकीय प्रक्रिया फक्त 2 ते 3 तासांत पूर्ण होतात.
– पूर्वी, दावा 24 तासांच्या आत उपलब्ध नसेल तर तो नाकारला जायचा पण आता तसं होणार नाही.
– यामुळे सामान्य लोकांना आर्थिक सुरक्षा मिळेल आणि उपचारांच्या प्रक्रियेत विलंब होणार नाही.
आता उपचार लहान असोत किंवा मोठा, तुम्ही फक्त 2 तासांसाठी रुग्णालयात दाखल असाल तरीही आरोग्य विमा तुम्हाला मदत करेल. अशा परिस्थितीत, तुम्ही तुमची पॉलिसी अद्याप अपडेट केली नसेल, तर तुमच्या विमा सल्लागाराशी बोलून नक्कीच माहिती मिळवा.