उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या निर्णयाची घोषणा करताना सांगितले की, मुंबई आणि परिसरातील प्रवाशांच्या भावना लक्षात घेऊनच हा निर्णय घेण्यात आला आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना ही भाडेवाढ रद्द करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या गेल्या आहेत.
गणेशोत्सव हा कोकणवासीयांसाठी अत्यंत भावनिक आणि महत्त्वाचा सण असून दरवर्षी लाखो प्रवासी आपल्या मूळ गावी कोकणात परततात. यावर्षी गणेशोत्सवासाठी एसटीने एकेरी आरक्षणासाठी 30 टक्के भाडेवाढ जाहीर केली होती, मात्र याला जोरदार विरोध झाला. नागरिकांनी सोशल मीडियावरून आणि विविध माध्यमांतून आपली नाराजी व्यक्त केली होती. प्रवाशांच्या या प्रतिक्रिया गांभीर्याने घेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यामध्ये तत्काळ हस्तक्षेप केला.
पंढरपूर येथे झालेल्या दौऱ्यात एकनाथ शिंदे यांनी ही भाडेवाढ रद्द केल्याचे जाहीर केले. त्यांच्या म्हणण्यानुसार, कोकणात जाणाऱ्या सामान्य जनतेवर आर्थिक बोजा नको म्हणून हा निर्णय तातडीने घेण्यात आला आहे. परिवहन विभागाने देखील प्रवाशांच्या सोयीसाठी यामध्ये सकारात्मक भूमिका घेतली.
या निर्णयामुळे गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या प्रवाशांचा प्रवास अधिक सोयीचा आणि परवडणारा होणार आहे. राज्य सरकारचा हा निर्णय कोकणातील चाकरमानी आणि भाविकांसाठी आनंदाची बातमी ठरली आहे.
Home
राजकीय
महत्वाची बातमी: 'लालपरी'च्या प्रवासाचा खर्च आता कमी, 'तो' निर्णय रद्द; उपमुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
महत्वाची बातमी: ‘लालपरी’च्या प्रवासाचा खर्च आता कमी, ‘तो’ निर्णय रद्द; उपमुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!

Read Also
Recommendation for You

Post Views : 321 मुंबईत दाखल होण्यापूर्वीच मुंबई उच्च न्यायालायाने जरांगेंसह करोडो मराठा समाजाला दणका…

Post Views : 321 सोनोपंत दांडेकर महाविद्यालय, पालघर येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे (YCMOU)…