banner 728x90

IND vs NZ Final: ICC स्पर्धांच्या फायनल मॅचमध्ये भारताचा न्युझीलंडविरुद्ध आतापर्यंतचा रेकाॅर्ड खराब!

banner 468x60

Share This:

Champions trophy 2025 IND vs NZ Final : भारतीय संघाने मोठी धडक मारत आयसीसी चॅम्पियन ट्राॅफीच्या अंतीम फेरीत प्रवेश केला. या स्पर्धेत एकही सामना न गमावता भारतीय संघान ही किमया साधली.

आता भारताला न्युझीलंड संघाचाच अडसर आहे, तो जर दूर झाला म्हणजेच फायनल मॅचमध्ये न्युझीलंडचा पराभव केला तर आयसीसी चॅम्पियन ट्राॅफीवर टीम इंडिया पुन्हा एकदा आपले नाव कोरणार आहे.

banner 325x300

तसे पाहता भारतीय संघ जोरदार फार्मात आहे, किंग कोहली,अय्यर आणि दुसरीकडे भारतीय सर्वच गोलंदाज आपल्या फार्मात आहेत, संघातील सर्वच सदस्य आपली चोख कामगिरी पार पाडत आहेत. पण आतापर्यंतच्या अंतीम सामन्याचे आकडे मात्र काहीसे वेगळे दिसत आहेत.

9 मार्च 2025 रोजी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या अंतिम फेरीत भारतीय संघाचा सामना न्यूझीलंडशी होणार आहे. भारताने उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाचा पराभव केला आणि किवी संघाने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करुन अंतीम फेरी गाठली आहे. दोन्ही सामने आमने-सामने भिडणार आहेत. हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणार आहे. आयसीसी स्पर्धांमध्ये या दोघांमध्ये हेड टू हेड बद्दल बोलायचे झाले तर भारताचा रेकॉर्ड चांगला राहिला नाही, आपण यासंदर्भात जाणून घेऊया.

चॅम्पियन्स ट्रॉफीमध्येच, 2 मार्च 2000 नंतर प्रथमच दोन्ही संघ पुन्हा आमनेसामने आले. स्पर्धेत पराभव पत्करूनही किवी संघाने उपांत्य फेरी गाठली आहे. या स्पर्धेत टीम इंडिया आतापर्यंत अजिंक्य ठरली आहे, तर दुसरीकडे केवळ भारतालाच न्यूझीलंडचा पराभव करता आला आहे. मात्र, आयसीसी स्पर्धांच्या फायनलमध्ये टीम इंडियाचा रेकॉर्ड चांगला राहिला नाही.

भारत विरुद्ध न्युझीलंड रेकाॅर्ड

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2021 च्या अंतिम फेरीत दोन्ही संघ आमनेसामने आले, जिथे न्यूझीलंडने भारताचा पराभव करून पहिल्या ICC स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.
इतकेच नाही तर याच किवी संघाने 2019 च्या आयसीसी क्रिकेट विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत भारतीय संघाची घौडदौड संपवली होती.
आयसीसी टी-20 विश्वचषकात भारताला न्यूझीलंड संघाविरुद्ध एकदाही विजय मिळवता आलेला नाही. दोन्ही संघ तीन वेळा आमनेसामने आले असून तीनही वेळा किवी संघाने विजय मिळवला आहे.
ICC क्रिकेट विश्वचषकाच्या इतिहासात दोन्ही संघ 11 वेळा आमनेसामने आले आहेत आणि येथे दोन्ही संघांनी प्रत्येकी 5 सामने जिंकले असून येथे मात्र दोन्ही संघानी बरोबरी साधली तर एक सामना अनिर्णित राहिला आहे.
न्युझीलंडसमोर कोहली, राहूलचे अडथळे

टीम इंडियाकडे विराट कोहली आणि केएल राहुलसारखे दिग्गज फलंदाज जे कधीही न्युझीलंडला पराभवाकडे नेऊ शकतात. तर रोहित शर्मा आणि शुभमन गिलसारखे झंझावाती सलामीवीर आणि हार्दिक पांड्यासारखा अष्टपैलू खेळाडू जे सामना एकहाती फिरवू शकतात.

भारतीय गोलंदाजीची ताकत

गोलंदाजांचा विचार केल्यास भारताची मदार वरुण चक्रवर्तीवर आहे मागील सामन्यासारखीच त्याने जर कामगिरी केली तर भारताला जिंकण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. एवढेच नाही तर रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल यांच्या गोलंदाजी आणि फलंदाजीने मैदानात केलेली अप्रतिम कामगिरी गोलंदाजांना खूप मदत करते. अशा परिस्थितीत टीम इंडिया आणखी एक आयसीसी विजेतेपद मिळवू शकते

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!