भारताचे महान खेळाडू विनोद कांबळी मागील बऱ्याच वर्षांपासून त्याच्या शारीरिक प्रकृतीशी झुंज देत आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता त्यामध्ये त्यांना एक व्यक्ती धरून नेत होता.
त्यानंतर त्याची प्रकृती थोडी सुधारली होती पण ते अजूनही पूर्णपणे बरे झाले नाहीत. भारताचे दोन अंपायर त्यांची प्रकृती पाहण्यासाठी गेले होते त्यावेळी त्यांनी एक व्हिडीओ शेअर केला होता आणि त्यावेळी सोशल मीडियावर तो व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला होता. दोन दिवसापूर्वी क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता.
टीम इंडियाचा माजी फलंदाज आणि महान सचिन तेंडुलकरचा बालपणीचा मित्र, विनोद कांबळी सध्या चर्चेत आहे. अलीकडेच कांबळी महान प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांच्या स्मृती कार्यक्रमात दिसला, जिथे तो महान तेंडुलकरांना भेटताना दिसला. यावेळी कांबळी यांची प्रकृती खालावल्याचे स्पष्टपणे दिसून आले. सचिनला भेटत असताना त्याला नीट उभे राहताही येत नव्हते. आता कांबळीची अवस्था पाहून 1983 च्या विश्वचषक विजेत्या स्टार्सनी त्याला मदत करण्याची चर्चा केली.
या कार्यक्रमाच्या काही दिवसांनंतर, कांबळीचा बालपणीचा मित्र आणि प्रथम श्रेणी पंच मार्कस कौटो यांनी टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितले, “त्याच्या आरोग्याच्या अनेक गंभीर समस्या आहेत. त्याला पुनर्वसनात जाण्यात काहीच अर्थ नाही. यापूर्वी 14 वेळा रिहॅबसाठी आम्ही त्याला वसईला नेले आहे.
आता कांबळीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, 1983 चा विश्वचषक विजेता भारतीय कर्णधार कपिल देव आणि गोलंदाज बलविंदर सिंग यांनी मदतीचा हात पुढे करण्यास सांगितले आहे. कांबळीला मदत करण्यापूर्वी त्याला आधी स्वत:ला मदत करावी लागेल, असे सांगण्यात आले.
रिपोर्टमध्ये बलविंदर सिंगच्या हवाल्याने म्हटले आहे की, “कपिल देवने मला स्पष्टपणे सांगितले आहे की, जर त्याला पुनर्वसनासाठी जायचे असेल तर आम्ही त्याला आर्थिक मदत करण्यास तयार आहोत. मात्र, त्याला आधी स्वत: पुनर्वसन करावे लागेल.” जर त्याने तसे केले तर उपचार कितीही काळ चालले तरी आम्ही बिल भरण्यास तयार आहोत.”
विनोद कांबळीने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 17 कसोटी आणि 104 एकदिवसीय सामने खेळले. कसोटीत त्याने 54.20 च्या सरासरीने 1084 धावा केल्या आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये 32.59 च्या सरासरीने 2477 धावा केल्या. त्याने कसोटीत 4 शतके आणि 3 अर्धशतके केली. याशिवाय एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने 2 शतके आणि अर्धशतके केली आहेत.