banner 728x90

Indian Railways Ticket Booking : भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय; तात्काळ तिकीट नियमांमध्ये महत्वाचा बदल

banner 468x60

Share This:

जे लोक रेल्वेने प्रवास करतात त्यांच्यासाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी तात्काळ तिकीट बुकिंगच्या (Indian Railways Ticket Booking) वेळेत बदल केला आहे.

त्यामध्ये आता एसी विभागातील तिकिटाचे बुकींग सकाळी 10 वाजता सुरू होईल, तर नॉन-एसी विभागातील तिकीट सकाळी 11 वाजता बुक करता येणार आहे. या महत्वपूर्ण निर्णयामुळे तात्काळ तिकीट बुकिंग प्रॉसेस जास्त सोपी होणार आहे. यामुळे हा निर्णय प्रवाशांना अधिक फायदेशीर ठरणार आहे.

banner 325x300

प्रवाशांसाठी फायदेशीर – Indian Railways Ticket Booking

ज्या लोकांना अचानक तिकीट हवे असेल , त्यांच्यासाठी या निर्णय उपयुक्त ठरणार आहे. नवीन वेळापत्रकामुळे बुकिंग व्यवस्थापन अधिक सुव्यवस्थित होणार आहे. एसी आणि नॉन-एसी कोचसाठी वेगवेगळ्या वेळा ठेवल्यामुळे सर्व्हरवरील ताण कमी होईल आणि बुकिंग व्यवस्था जलद होण्यास मदत मिळेल.

बुकिंग कसे करावे –

तात्काळ तिकीट बुक (Indian Railways Ticket Booking) करण्यासाठी, सर्वप्रथम आयआरसीटीसीच्या अधिकृत वेबसाइटवर लॉगिन करा. जर तुमचं अकाउंट नसेल, तर तुम्हाला नवीन अकाउंट ओपन करावे लागेल. त्यानंतर Plan My Journey पर्यायावर क्लिक करून प्रवासाची माहिती भरा. यामध्ये मार्ग, तारीख आणि विभाग निवडून, तात्काळ बुकिंगचा पर्याय निवडा. प्रवाशांचे नाव, वय, लिंग आणि इतर आवश्यक माहिती भरून, पुढे क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, यूपीआय किंवा नेट बँकिंगद्वारे तिकीटाचे पैसे भरा. बुकिंग पूर्ण झाल्यानंतर तिकीटाची माहिती एसएमएस आणि ईमेलद्वारे मिळेल. पण तात्काळ बुकिंगच्या तिकीटावर रिफंड मिळवता येणार नाही, त्यामुळे तुम्ही प्रवासासाठी तिकिटाचे ठरवलेले वेळेवर नियोजन करा.

बुकिंगसाठी पूर्व तयारी करणे गरजेचे –

अनके प्रवाशी कोणत्याना ना कोणत्या कारणासाठी तात्काळ सेवेचा वापर करतात. पण काही क्षणातच बुकिंग प्रक्रिया पूर्ण करणे शक्य नसते. त्यामुळे कित्येकदा आपले बुकिंग रद्द होते. जर तुम्हाला तुमचे तिकीट कन्फर्म करायचं असेल , तर त्यासाठी तुम्ही पूर्व तयारी करणे गरजेचे असते. त्यामध्ये सर्वप्रथम तुमच्या फोनचे इंटरनेट स्पीड चांगले आहे का हे चेक करा , त्यानंतर तात्काळ तिकीट बूक करण्याआधीच लॉगीन करा. बुकिंगसाठी लागणारी सर्व माहिती तुमच्या जवळ असणे आवश्यक आहे. हि माहिती न चुकता टाकून आपली प्रोसिजर पूर्ण करा . यामुळे तुम्हाला आधीपेक्षा सहज आणि झटपट तात्काळ तिकीट मिळवण्यास मदत मिळेल .

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!