banner 728x90

KDMC: कल्यण डोंबिवली महापालिकेचा घोटाळा, जेलमध्ये असणाऱ्या कैद्याला दिला पगार, मोठी खळबळ

banner 468x60

Share This:

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचा गलथान कारभार पुन्हा एकदा उघडकीस आला आहे. बलात्काराच्या गंभीर आरोपाखाली तब्बल 40 दिवस जेलमध्ये असलेल्या एका केडीएमसी कर्मचाऱ्याला महापालिकेकडून पगार देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

डोंबिवलीतील मानपाडा पोलीस ठाण्यात 3 मे 2025 रोजी स्वप्नील जोशी नावाच्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. एका तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केल्याचा गंभीर आरोप त्याच्यावर आहे. पोलिसांनी कारवाई करत स्वप्नील जोशी याला अटक केली होती. अटकेनंतर तो तब्बल 40 दिवस न्यायालयीन कोठडीत, म्हणजेच जेलमध्ये होता. त्यानंतर त्याची जामिनावर सुटका झाली.

मात्र, अटकेच्या वेळी आणि त्यानंतरच्या तपासातही हा आरोपी सरकारी कर्मचारी असल्याची माहिती पोलिसांच्या समोर आली नव्हती. तपास सुरू असतानाच सहा महिन्यांचा काळ उलटल्यानंतर 27 डिसेंबर 2025 रोजी मानपाडा पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी केडीएमसी प्रशासनाला पत्र पाठवले. या पत्रात स्वप्नील जोशी हा तुमचा कर्मचारी असून त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल असून तो 40 दिवस जेलमध्ये होता, अशी माहिती देण्यात आली. हे समोर येताच महापालिका प्रशासनात एकच खळबळ उडाली.
मोठा प्रशासकीय आणि तांत्रिक घोळ समोर

स्वप्नील जोशी हा केडीएमसीच्या ‘फ’ प्रभाग कार्यालयात कार्यरत असल्याचे स्पष्ट झाले आहे. सर्वात संतापजनक बाब म्हणजे, तो जेलमध्ये असतानाही महापालिकेने त्याचा पगार रोखलेला नव्हता. शासकीय नियमांनुसार कोणताही कर्मचारी 48 तासांपेक्षा जास्त काळ पोलीस कोठडीत किंवा जेलमध्ये असल्यास त्याचे तात्काळ निलंबन अपेक्षित असते. मात्र, जोशी 40 दिवस गैरहजर असतानाही त्याची हजेरी नेमकी कोणी आणि कशी लावली, तसेच त्याला पगार कसा देण्यात आला, हा मोठा प्रशासकीय आणि तांत्रिक घोळ समोर आला आहे.

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!