banner 728x90

कोल्हापूरकरांसाठी अनंत अंबानींचे चार शब्द, म्हणाले…, धार्मिक व सांस्कृतिकेची जाणीव

banner 468x60

Share This:

वनतारा प्राणी संवर्धन केंद्रामध्ये उपचार घेत असलेली महादेवी (माधुरी) हत्तीण पुन्हा नांदणी मठामध्ये परतणार आहे. तिच्या घरवापसीसाठी नांदणी मठ, महाराष्ट्र शासन आणि वनतारा संस्था न्यायालयात एकत्रित पुनर्विचार याचिका दाखल करेल.

नांदणी मठात महादेवीसाठी सर्व प्रकारच्या सुविधा वनतारा उपलब्ध करून देईल. लोकभावनेचा आदर करून अनंत अंबानी यांनी हा निर्णय घेतला आहे, अशी माहिती वनताराचे मुख्य कार्यकारी अधिकारी विहान करणी यांनी दिली.

याबाबत अनंत अंबानी यांनीही यावर वक्तव्य केलं आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी येथील जैन मठ आणि तेथील जनतेसाठी महादेवी (माधुरी) हत्तीणीच्या धार्मिक व सांस्कृतिक महत्त्वाची आम्हाला पूर्णपणे जाणीव आहे. ती अनेक दशकांपासून तेथील अध्यात्मिक परंपरेचा आणि जीवनशैलीचा अविभाज्य भाग राहिलेली आहे. त्या भावनांचा आम्ही मनापासून आदर करतो.

जैन मठ व महाराष्ट्र शासन महादेवीला परत आणण्यासाठी न्यायालयात अर्ज दाखल करत असतील, तर त्याला वनतारा पूर्णपणे त्यांच्यासोबत राहील. न्यायालयाच्या आदेशानुसार महादेवीच्या सुरक्षेसाठी, तिच्या उत्तम प्रकृतीसाठी आवश्‍यक ती सर्व तांत्रिक व वैद्यकीय मदत देण्यास आमचे प्रथम प्राधान्य राहील. महादेवीचे उत्तम स्वास्थ्य हीच आमची प्राथमिकता आहे. असे वनताराचे प्रमुख अनंत अंबानी म्हणाले.

वनताराचे सीईओ विहान करणी म्हणाले, ”कोणाच्याही भावना दुखावणे हा अनंत अंबानी आणि वनतारा संस्थेचा कधीच उद्देश नव्हता. वन्यजीवांना चांगले जीवन मिळावे, अशीच आमची इच्छा आहे. त्यांची काळजी कोणीही घेतली तरी आमची हरकत नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्याच्या हेतूने आम्ही महादेवीला वनतारामध्ये नेले. मात्र, विनाकारण आम्हाला दोषी ठरवण्यात आले.

नांदणी मठाधीश भट्टारक पट्टाचार्य जिनसेन स्वामी म्हणाले, शासन, मठ आणि वनतारा एकत्रितपणे पुनर्विचार याचिका दाखल करणार आहेत. नांदणीच्या मठामध्ये वनतारातर्फे महादेवीसाठी आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. साऱ्या सुविधा जरी वनताराच्या असल्या तरी महादेवीची मालकी ही नांदणी मठाचीच असेल. वनतारा आणि अनंत अंबानी यांनी जो मंगल निर्णय घेतला त्याला आशीर्वाद आहेत.

लोकभावनेचा आदर करून अनंत अंबानी यांनी महादेवीला नांदणी मठात परत आणण्याचा निर्णय घेतला आहे. एवढेच नव्हे तर नांदणीच्या मठात महादेवीसाठी सर्व प्रकारच्या सुविधा वनतारातर्फे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. हा जनभावनेचा प्रश्न आहे. ही कोणाच्याही अहंकाराची लढाई नाही. यामध्ये कोणाचेही हरणे किंवा जिंकणे नाही. न्यायालयात वनतारा, महाराष्ट्र शासन आणि वनतारा मिळून याचिका दाखल करणार आहेत. यामध्ये आम्ही न्यायालयाला हे पटवून देऊ की नांदणी मठामध्ये महादेवीची सर्व प्रकारची काळजी घेतली जाईल. त्यामुळे महादेवी कोल्हापूरकरांच्या सहवासात आनंदात राहील.

महादेवी नांदणी परिसरात एक उपकेंद्र (सॅटेलाइट रिहॅब सेंटर) स्थापन करण्यासाठी जैन मठ व राज्य सरकारसोबत समन्वय साधून काम करण्याची तयारी वनताराने दर्शवली आहे. हे केंद्र पशू कल्याण मार्गदर्शक तत्त्वांनुसार, उच्चस्तरीय तज्ज्ञ समितीच्या सल्ल्याने आणि मठाच्या संमतीने, आंतरराष्ट्रीय निकषांनुसार उभारले जाईल.

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!