banner 728x90

लालपरीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी ! आता राज्यातील ‘या’ लोकांना पण 100% मोफत प्रवास करता येणार

banner 468x60

Share This:

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून नुकतीच एक मोठी घोषणा करण्यात आली आहे. म्हणून जर तुम्हीही लाल परीने प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी सुद्धा उपयुक्त ठरणार आहे.

खरंतर राज्यात रेल्वे प्रमाणेच एसटीने प्रवास करणाऱ्यांची संख्या देखील फारच उल्लेखनीय आहे.

एस टी महामंडळाकडून आपल्या प्रवाशांसाठी विविध योजना देखील चालवल्या जातात. राज्य सरकार देखील सर्वसामान्य नागरिकांसाठी विविध सवलतीच्या योजना राबवत आहे. राज्य शासनाच्या माध्यमातून दिव्यांग व्यक्तींना एसटीच्या प्रवासात विशेष सवलत दिली जात आहे.

यासोबतच विद्यार्थिनींना आणि विद्यार्थ्यांना देखील सशुल्क तसेच मोफत पास सारखी सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे. या व्यतिरिक्त राज्य सरकारकडून राज्यातील महिलांना एसटीच्या प्रवासात 50 टक्के सवलत देण्यात आली आहे.

म्हणजे महिलांना एसटीने अर्ध्या भाड्यात प्रवास करता येणे शक्य आहे. दुसरीकडे जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना एसटीच्या प्रवासात शंभर टक्के सवलत देण्यात आली आहे. म्हणजेच ज्येष्ठ नागरिकांना एसटीने मोफत प्रवास करता येणे शक्य झाले आहे. अशातच आता राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एक मोठी घोषणा केली आहे.

या लोकांनाही मिळणार विशेष सवलत

मंत्री प्रताप सरनाईक यांनी राज्यातील पत्रकारांसाठी सध्या लागू असणाऱ्या सवलतीच्या योजनेत मोठा बदल होणार असल्याचे आश्वासन दिले आहे. मंत्री प्रताप सरनाईक यांनी मंत्रालयातील आणि विधिमंडळ वार्ताहर संघ यांच्या पदाधिकाऱ्यांसोबत नुकतीच एक महत्त्वाची बैठक घेतली आणि या बैठकीत त्यांनी असे सांगितले आहे की, सद्यस्थितीत अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना साध्या, निमआराम व शिवशाही (आसनी/शयनयान) बसेस मध्ये मोफत प्रवासाची सवलत मिळत आहे.

पण या सवलतीवर 8 हजार किलोमीटरची मर्यादा घालून देण्यात आली आहे. दरम्यान, आता ही मर्यादा रद्द करण्यात येणार आहे. पत्रकारांना लागू असणाऱ्या सवलतीसाठी जी 8000 km ची अट आहे ती अट रद्द करण्याची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून उपस्थित केली जात असून या मागणीवर आता सरकारकडून सकारात्मक निर्णय घेतला जाईल अशी माहिती मंत्री सरनाईक यांनी यावेळी दिली आहे.

एवढेच नाही तर राज्यातील पत्रकारांना सर्वच प्रकाराच्या बसेस मधून मोफत प्रवासाची सवलत उपलब्ध करून देण्याचा विचार सुरू असून यामुळे पत्रकारांना ग्रामीण भागात देखील एसटी बसने जाता येणे शक्य होणार आहे आणि यामुळे पत्रकारांना आपले कर्तव्य बजावताना सहकार्य मिळणार आहे.

दुसरीकडे पत्रकारांना ऑनलाईन रिझर्वेशन करण्याची देखील सुविधा उपलब्ध नाहीये पण लवकरच ही देखील सुविधा उपलब्ध करून दिली जाणार असे आश्वासन मंत्री महोदयांनी यावेळी दिले आहे. ऑनलाइन रिझर्वेशनची ही सुविधा पुढील महिन्यापासूनच लागू होण्याची शक्यता आहे. परंतु या निर्णयाचा अधिस्वीकृतीधारक पत्रकारांनाच लाभ होणार आहे.

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!