banner 728x90

विधिमंडळ गाजवण्यात आ.निकोले यांचा झेंडा उंचच! ; जिल्ह्यातून मांडले सर्वाधिक प्रश्न

banner 468x60

Share This:

पालघर-योगेश चांदेकर


राज्यात प्रश्न मांडण्यात सातवा क्रमांक
‘संपर्क’ संस्थेच्या अहवालात निकोले यांच्या कामगिरीवर शिक्कामोर्तब

banner 325x300

पालघरः विधिमंडळात कुणी, किती काम केले, कुणाची हजेरी किती असते, कोण किती प्रश्न मांडतात. याबाबत मुंबईतील ‘संपर्क’ ही संस्था कायम आपला अहवाल प्रसिद्ध करते. ‘संपर्क’ संस्थेच्या या वर्षाच्या अहवालात डहाणू विधानसभा मतदारसंघाचे आमदार विनोद निकोले यांनी जिल्ह्यात सर्वाधिक २३७ प्रश्न मांडून पहिला क्रमांक पटकावला आहे, तर राज्यातील ३६६ आमदारांत त्यांचा प्रश्न विचारणाऱ्या आमदारांत सातवा क्रमांक आहे.

मुंबई येथील ‘संपर्क’ ही संस्था धोरण विषयक अभ्यास व पाठपुरावा करत असते. विधिमंडळातील आमदारांच्या कामाचे मूल्यमापन ही संस्था करत असते. त्याबाबतचा अहवाल ती प्रकाशित करीत असते. महाराष्ट्राची चौदावी विधानसभा लवकरच विसर्जित होणार असून विधानसभेच्या निवडणुकांना राज्य सामोरे जाणार आहे. विधानसभेत २८८ आमदार तर विधान परिषेदत ७८ आमदार आहेत.

डाव्या आमदाराची उजवी कामगिरी!
२०१९ ते २०२४ या पाच वर्षात विधिमंडळाची एकूण बारा अधिवेशने पार पडली. या १२ अधिवेशनात विधानसभा व विधान परिषदेच्या आमदारांनी ५९२१ प्रश्न सभागृहात उपस्थित करून त्यावर राज्य सरकारला उत्तरे द्यायला भाग पाडले. त्यात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाकडून डहाणू मतदारसंघातून निवडून आलेल्या विनोद निकोले यांची कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे. विधिमंडळाच्या बारा अधिवेशनात १३१ दिवस कामकाज झाले. त्यात प्रश्न व लक्षवेधी सूचना मांडून मतदारसंघाच्या तसेच राज्याच्या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधण्यात आले. सरकारच्या धोरणात्मक विषयाबाबत शंका उपस्थित करून त्याबाबत स्पष्टीकरण मागण्यात आले. मतदारसंघातील काही प्रश्न या निमित्ताने उपस्थित करण्यात आले.

आदिवासी भागाच्या प्रश्नांना प्राधान्य
कोरोनाच्या काळात विधिमंडळाची तीन अधिवेशने रद्द करण्यात आली, तर २०२४ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात प्रश्नोत्तराचा तास झालाच नाही. या विधानसभेत प्रश्न उपस्थित करण्याची संधी मागील विधानसभेच्या कामकाजाच्या तुलनेत कमी मिळाली. वेगवेगळ्या आमदारांनी कोणकोणत्या विषयावर प्रश्न मांडले, याचा लेखाजोखा ही ‘संपर्क’ या संस्थेने दिला आहे. त्यात आमदार आशिष शेलार यांनी बालकांविषयी २८ प्रश्न, तर आरोग्य विषयी सर्वाधिक ८२ प्रश्न मांडले. अमिन पटेल यांनी महिलाविषयक २१ आणि शिक्षक विषयक ४५ प्रश्न विधिमंडळाच्या वेगवेगळ्या अधिवेशनात मांडले, तर डहाणूचे आमदार निकोले यांनी ज्या आदिवासी भागातून आपण निवडून येतो, त्या आदिवासी भागाला डोळ्यासमोर ठेवून राज्यातील आदिवासींची एकूण स्थिती समस्या आणि त्यांच्या संबंधात राज्य सरकारने केलेल्या तरतुदींबाबत एकवीस प्रश्न उपस्थित करून सरकारकडून त्याची उत्तरे घेतली.

आ. आशिष शेलार यांचा पहिला क्रमांक
राज्यात विविध आमदारांनी ५९२१ तारांकित प्रश्न उपस्थित केले, तर २१३० लक्षवेधी सूचना मांडल्या तारांकित प्रश्न मांडणाऱ्या आमदारात अमीन पटेल यांचा प्रथम क्रमांक लागतो. त्यांनी ६५६ प्रश्न मांडले, तर आमदार शेलार यांनी ६३ मांडले आमदार असलम शेख यांनी ५३२ आमदार मनीषा चौधरी यांनी ४५९ आमदार कुणाल पाटील यांनी ३५७ आमदार प्रतिभा धानोरकर यांनी ३१६ तर सातव्या क्रमांकावर असलेल्या आमदार विनोदी निकोले यांनी २३७ प्रश्न मांडले

‘मी पहिल्यांदाच विधानसभेत आमदार म्हणून निवडून आलो. विधिमंडळ कामकाजात माझे स्वीय सहाय्यक शाहरुख मुलाणी यांचे मोलाचे सहकार्य मिळाले. राज्यातील पहिल्या सात सर्वसाधारणमध्ये माझी निवड झाल्याचे ‘संपर्क’ संस्थेच्या अहवालातून स्पष्ट झाले. त्याबद्दल अभिमान आहे. शेतकरी, कामगार, आदिवासी तसेच इतर जनतेने प्रश्न मांडण्यासाठीच मला विधानसभेत पाठवले आहे. त्यांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवण्याचा प्रयत्न मी केला. यापुढेदेखील जनतेने अधिक काम करण्याची संधी मला द्यावी.
-विनोद निकोले, आमदार, डहाणू विधानसभा मतदारसंघ

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!